Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

Approval to provide Rs 480 crore to rain-affected farmers in these 6 districts of the state; Aid distribution begins | राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

अमरावती विभागातील
अकोला जिल्ह्यासाठी ९१ कोटी १२ लाख ५८ हजार
बुलढाणा जिल्ह्यासाठी २८९ कोटी २७ लाख २८ हजार
वाशीम जिल्ह्यासाठी ३४ कोटी ६४ लाख ८४ हजार
जालन्यासाठी ८३ लाख ८४ हजार
हिंगोलीसाठी ६४ कोटी ६१ लाख ८३ हजार
अशी एकूण ४८० कोटी ५० लाख ३८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.

◼️ वरील जिल्ह्यांतील ५ लाख ३७ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ७२ हजार ८६६ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.
◼️ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत आहे.

अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर

Web Title : महाराष्ट्र: बारिश से प्रभावित किसानों के लिए ₹480 करोड़ की सहायता स्वीकृत

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने अमरावती और छत्रपति संभाजीनगर संभागों में अत्यधिक वर्षा और बाढ़ से फसल क्षति के कारण किसानों के लिए ₹480 करोड़ की सहायता स्वीकृत की। अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना और हिंगोली जिलों को लाभ होगा, और तीन हेक्टेयर तक भूमि पर आकलन किए गए नुकसान के लिए एनडीआरएफ मानदंडों के आधार पर भुगतान जारी है।

Web Title : Maharashtra Approves ₹480 Crore Aid for Rain-Affected Farmers

Web Summary : Maharashtra government approves ₹480 crore aid for farmers in Amravati and Chhatrapati Sambhajinagar divisions due to crop damage from excessive rainfall and floods. Akola, Buldhana, Washim, Jalna, and Hingoli districts will benefit, with payouts underway based on NDRF norms for assessed losses on up to three hectares of land.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.