सन १८८१ च्या फेमीन कमीशनने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मे, १९८७ च्या शेतकरी मासिकाच्या अंकामध्ये कृषि विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्रथम वापरण्यात आले.
सद्यस्थितीत कृषि विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे.
आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर सदर बोधचिन्हाची रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे.
यामुळे सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने कृषि विभागाचे बोधचिन्ह व घोषवाक्य (Tagline) निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कृषि विभागामार्फत वापरण्यात येणारे जुने बोधचिन्ह व घोषवाक्य यांच्या वापराऐवजी आता नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे Tagline त्याच Calligraphy मध्ये वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
वापरण्यास अटी व शर्ती
अ) या आदेशानंतर कृषि विभागाचे पुर्वी वापरात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य यांचा अन्य कोणाकडूनही गैरवापर होऊ नये, या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही आयुक्त, कृषि यांनी करावी.
ब) सदर बोधचिन्ह/Logo व घोषवाक्य/Tagline कृषि विभागाच्या सर्व प्रचारात्मक उपक्रमामध्ये ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावे.
कसे आहे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य
◼️ बोधचिन्हात 'कृषी कल्याण कर्तव्यम्' ह्या ओळीचा उल्लेख केला आहे.
◼️ 'शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी' हे नवीन घोषवाक्य आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासाठी 'ह्या' त्रुटींची पूर्तता करा तरच मिळतील पैसे
