मुंबई : केळी पिकावर पडणाऱ्या मर किंवा पनामा रोगापासून शेतकऱ्यांना आता कायमची मुक्ती मिळणार आहे. यावर आता जागतिक संशोधन झाले आहे.
जनुकीय सुधारणा करून मर रोगमुक्त केळींचे QCAV-4 हे नवे वाण ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. व्यावसायिक उत्पादनासाठी मंजूर झालेली ती जगातील पहिली जीएम केळी आहेत.
२० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हे केळीचे नवीन जीएम वाण शोधले.
आशेचा नवा किरण
◼️ पनामा म्हणजेच फ्युजारियम मर रोग (टीआर- ४) हा एक विनाशकारी बुरशीजन्य रोग आहे.
◼️ केळीच्या झाडाला पोषक तत्त्वांचा पुरवठा बंद करतो, ज्यामुळे ते झाड मरते.
◼️ ही बुरशी मातीत ५० वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकते.
◼️ त्यामुळे जगभरातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना या जीएम केळीने आशेचा किरण दिसू लागला आहे
सुरक्षित आहे का?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा नियामकांनी या केळीचे सखोल मूल्यांकन केले. त्यांच्या निष्कर्षानुसार ही जीएम केळी सामान्य केळीएवढीच मानवी वापरासाठी सुरक्षित आहे.
ही केळी नेमकी कशी काम करते?
◼️ एका जंगली केळीतून घेतलेले एकच प्रतिकार जनुक टाकून हे नवीन जीएम चाण बनवण्यात आले आहे.
◼️ हे नैसर्गिकरीत्या प्रतिरोधक आहे.
◼️ हे जनुक असे प्रथिने तयार करते जे केळीच्या पेशींना बुरशीचा शिस्काव ओळखण्यास मदत करतात.
◼️ झाडाची संरक्षण यंत्रणा तात्काळ कार्यान्वित होते.
◼️ संसर्ग पसरण्यापासून रोखला जातो.
केळी उत्पादन
◼️ ३० ते ३६.७% केळींचे उत्पादन एकट्या भारतात होते.
◼️ ०४ कोटी टन उत्पादन भारतात होते. बहुतांशी केळी निर्यात होते.
अधिक वाचा: देशात ३२५ कारखान्यांचे गाळप सुरू; यंदा किती साखर उत्पादन होणार? काय आहे अंदाज?
