सोलापूर : ऑगस्ट महिन्याचा ६० कोटी रुपये मंजुरीचा पहिला आदेश १२ सप्टेंबर रोजी, सप्टेंबर महिन्याचा ७७२ कोटी ३७ लाख रुपयांचा दुसरा आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला आहे.
तर दोन्ही महिन्यातील दोन हेक्टरवरील ८५ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या ६५ हजार ७५१ हेक्टरसाठी ९५ कोटी रुपये नुकसान भरपाईचा आदेश २० ऑक्टोबर रोजी निघाला आहे.
आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार? हा प्रश्न आहे. ऑगस्ट महिन्यात १० मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्याचे पंचनामे झाले व शासनाकडे अहवाल गेल्यानंतर १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्याला ६० कोटी मंजूर झाले.
त्यातील शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात आल्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१८ ऑक्टोबर रोजी ७७२ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले व रक्कमही आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन हेक्टरपर्यंतची रक्कम मंजूर झाली व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.
तीन हेक्टरपर्यंतचे ८५ हजार शेतकरी
◼️ सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची ८५ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या ६५ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रासाठी २५ कोटी एक लाख रुपये मंजुरीचा आदेश २० ऑक्टोबर रोजी शासनाने काढला आहे.
◼️ निधी मंजूर व निधी वितरण तत्काळ होत असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास उशीर लागत आहे.
