सांगोला : खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी मंगळवार अखेर (दि. १८) सांगोला तालुक्यातील ७५ हजार ९४६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ११६ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांचा दुष्काळनिधी जमा केला आहे.
दोन वर्षापूर्वी सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी १५७ कोटी ७ लाख ६७ हजार रुपयांचा इतक्या रकमेची तरतूद केली होती.
आतापर्यंत ७६ हजार ९२४ बाधित शेतकरी खातेदारांच्या ११९ कोटी १६ लाख ३४ हजार ५८३ रुपयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत.
५ लाख ४१ हजार ६७५ रुपयांचा निधी प्रलंबित आहे. ३४ खातेदारांची ई-केवायसी झाल्यानंतर निधी प्राप्त होणार आहे. आजअखेर ७५ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११६ कोटी २६ लाख २९ हजार ५३ रुपयांचे दुष्काळ अनुदान जमा आहे.
पाच हजार हेक्टरांचे नुकसान
सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये २ हेक्टर मर्यादित ४४ हजार ०६७हेक्टर जिरायत, २१ हजार ५४३ हेक्टर बागायत, १४ हजार १९९ हेक्टर बहुवार्षिक पिके असे ७९ हजार ८१० हेक्टर पिकांचे तसेच २ ते ३ हेक्टर मर्यादेत २४ हजार ०६५ हेक्टर जिरायत, १० हजार ३६१ हेक्टर बागायत, ५ हजार ७६७ हेक्टर बहुवार्षिक पिके असे ४० हजार २९३ हेक्टर पिकांचे, तर २ हेक्टर मर्यादेत (२२४५-२४३४) ३ हजार ७४५ हेक्टर जिरायत, ३ हजार ६६२ हेक्टर बागायत, ३ हजार १९४ हेक्टर बहुवार्षिक पिके असे १० हजार ६०३ हेक्टर पिकांबरोबर २ ते ३ हेक्टर मर्यादेत (२२४५-२१६७) २ हजार ९४५ हेक्टर जिरायत, १ हजार ७६१ हेक्टर बागायत, १ हजार २९७हेक्टर बहुवार्षिक पिके असे एकूण ५ हजार १०४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते
अद्यापही ३४ खातेदारांची ई-केवायसी करणे प्रलंबित असून, त्यांनी तत्काळ ई-केवायसी करावी. उर्वरित शेतकरी खातेदार यांनी लवकरात लवकर खरीप २०२३ दुष्काळ अनुदान मिळण्यासाठी फॉर्म व त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा उतारा झेरॉक्स प्रत तलाठी यांच्याकडे जमा करावी. - संतोष कणसे, तहसीलदार, सांगोला