Lokmat Agro >शेतशिवार > विदर्भाच्या बीटीबीमधून उत्तर प्रदेशला दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात; परिसरातील शेतकऱ्यांना मिळातोय आधार

विदर्भाच्या बीटीबीमधून उत्तर प्रदेशला दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात; परिसरातील शेतकऱ्यांना मिळातोय आधार

7-8 tonnes of mangoes are exported to Uttar Pradesh from Vidarbha's BTB every day; Farmers in the area are getting support | विदर्भाच्या बीटीबीमधून उत्तर प्रदेशला दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात; परिसरातील शेतकऱ्यांना मिळातोय आधार

विदर्भाच्या बीटीबीमधून उत्तर प्रदेशला दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात; परिसरातील शेतकऱ्यांना मिळातोय आधार

Mango Export From Vidarbha : भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला असून सध्या बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० रुपयाचा दर सुरू आहे.

Mango Export From Vidarbha : भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला असून सध्या बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० रुपयाचा दर सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भ भाजीपाला व फळबागेत 'सुजलाम् सुफलाम्'तेच्या मार्गात आहे. त्यात भंडारा जिल्हा भाजीपाला व फळबागेत प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याने उत्पादनाची गुणवत्ता व मुबलकता सिद्ध केली.

भंडारा येथील बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० रुपयाचा दर सुरू आहे.

भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला. किमान दहा महिने बीटीबीमधून देशाच्या कोनाकोपऱ्यात भाजीपाल्याची निर्यात सुरू आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या शेताला उत्पादनाचे हब बनविले आहे. कित्येक शेतकऱ्यांनी धानाचे क्षेत्रफळ कमी करून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढवले आहे. याच धरतीवर भविष्यात फळबागेच्या नियोजन वाढीलासुद्धा प्रोत्साहन मिळत आहे.

बांधावर करावी आंब्याची लागवड

• आंध्र व तामिळनाडू येथून जिल्ह्यात लंगडा आंबा, तोता, बैगनफल्ली व हापूस आंब्याची आयात केली जाते. जिल्ह्यात मे व जून महिन्यात मोठी मागणी असते. ती पूर्ण करण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करावी.

• इतर राज्यांतून आंब्याची होणारी आवक थांबवण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आंब्याची लागवड केल्याने निसर्ग, पर्यटन व उत्पादन तिन्ही घटकांना न्याय मिळतो. जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यात थांबून शेतकऱ्यांना नगदी रुपयाची आवक बागायतीतून शक्य आहे.

आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे. यावर्षी आंचेसुद्धा चांगले बहरले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी आहे. ऊन वाढत असल्याने मागणी वाढेल. मागणी वाढेल तसा भावसुद्धा वाढेल. शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे. - बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा.

हेही वाचा :  ढेगे पिंपळगावच्या शेतात पिवळ्या टरबूजचा यशस्वी प्रयोग; ओमरावांनी घेतले ४० गुंठयात दोन लाख चाळीस हजारांचे उत्पन्न

Web Title: 7-8 tonnes of mangoes are exported to Uttar Pradesh from Vidarbha's BTB every day; Farmers in the area are getting support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.