नितीन उघडे
कामती : मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथील शेतकरी लखन माने यांना कांद्याच्या १०० गोण्यांना अवघे ७ हजार ३,३५६ रुपये मिळाले. हमाली, तोलाई, वाहतूक खर्च वगळून केवळ जवळपास (१,३५७.७५ रुपये) मिळाले.
संतप्त शेतकऱ्याने हतबल होऊन दोन एकर शेतातील कांद्याला आग लावून पेटवून दिला. सोमवारी हा प्रकार घडला. प्रकारानंतर शेतकऱ्यांमधून या हमीभावाची मागणी होत आहे.
शेतकरी लखन माने यांनी मोठा खर्च करून दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणी यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला.
मात्र, बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
शंभर गोणी कांद्याला अवघे १,४०० रुपयांच्या जवळपास पट्टी मिळाल्याने हतबल झालेल्या लखन माने यांनी अखेर शेतातील कांद्याला आग लावून आपला संताप व्यक्त केला.
याला म्हणायचे का भाव?
◼️ लखन माने ८ एप्रिल रोजी कोल्हापूरच्या एका आडत दुकानावर १०० गोणी कांदा विक्रीसाठी कोल्हापूरच्या बाजार समितीत घेवून गेले होते.
◼️ मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने व मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो जवळपास केवळ ६७ पैसे रुपये इतकाच भाव मिळाला. याला भाव म्हणायचे का? असा सवाल शेतकरी लखन माने यांनी केला.
◼️ मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम व त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे.
अशी मिळाली पट्टी
◼️ कांदा - १०० गोणी
◼️ हमाली - २८७ रु. २८ पैसे
◼️ तोलाई - १७१ रु. ३२ पैसे
◼️ वारणी - २५५ रु. १५ पैसे
◼️ वाहतूक भाडे - ४५५० रु.
◼️ सौदा हमाली - १५६ रु.
◼️ इतर - ४६८ रु.
◼️ एकूण पट्टी - ७,३५६.४ रु.
◼️ एकूण खर्च - ५,५८८.७५ रु.
◼️ वजा जाता - १,३५७.४५ रु.
सरकारच्या अशा बेजबाबदारपणाने 'शेतकऱ्याने जगायचं कसं?' शासनाने कांद्याला योग्य हमीभाव द्यावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, माझ्यासारख्या लाखो शेतकरी आज हतबल झाले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. - लखन माने, शेतकरी, घोडेश्वर
अधिक वाचा: जगातील सर्वांत महागडा जपानमधील मियाझाकी आंबा फुलतोय सांगलीतील 'या' शेतकऱ्याच्या शेतात
Web Summary : Farmer Lakhan Mane, devastated by paltry ₹1400 for 100 onion sacks, torched his two-acre crop. Costs exceeded returns due to low market prices, sparking calls for fair pricing.
Web Summary : 100 प्याज की बोरियों के लिए केवल ₹1400 मिलने से निराश किसान लखन माने ने दो एकड़ की फसल जला दी। कम बाजार मूल्यों के कारण लागत अधिक थी, जिससे उचित मूल्य निर्धारण की मांग उठी।