Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > मेंढीपालनात मटणासाठी विशेष लोकप्रिय जात म्हणून 'ह्या' मेंढीचे महाराष्ट्रात मोठं नाव लौकिक

मेंढीपालनात मटणासाठी विशेष लोकप्रिय जात म्हणून 'ह्या' मेंढीचे महाराष्ट्रात मोठं नाव लौकिक

This sheep is famous in Maharashtra as a breed that is particularly popular for its meat. | मेंढीपालनात मटणासाठी विशेष लोकप्रिय जात म्हणून 'ह्या' मेंढीचे महाराष्ट्रात मोठं नाव लौकिक

मेंढीपालनात मटणासाठी विशेष लोकप्रिय जात म्हणून 'ह्या' मेंढीचे महाराष्ट्रात मोठं नाव लौकिक

मेंढपाळांच्या मते मडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ व सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे.

मेंढपाळांच्या मते मडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ व सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे.

मेंढपाळांच्या मते मडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ व सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे.

madgyal mendhi मडग्याळ मेंढ्या झपाट्याने वजन वाढवण्याची क्षमता दर्शवतात. माडग्याळ ही महाराष्ट्रातील मोठ्या आकाराची व मटणासाठी विशेष लोकप्रिय मेंढी आहे.

प्रामुख्याने पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके आढळतात तर काही मेंढ्या तपकिरीदेखील दिसतात. महाराष्ट्रातीलसांगली जिल्ह्याने आज पशुपालनात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील 'माडग्याळ' मेंढी आज मेंढीपालकांसाठी प्रगतीचा मार्ग ठरत आहे. धिप्पाड शरीर व आकर्षक रोमन पद्धतीचा बाक असलेल्या नाकामुळे या जातीने देशभरातील पशुपालकांचे लक्ष वेधले आहे.

शारीरिक वैशिष्ट्ये
◼️ पोपटी नाक हे या जातीचे मुख्य ओळखचिन्ह असून, यामुळे मेंढ्यांना अधिक दर मिळतो.
◼️ शेपटी मध्यम व पातळ असून लोकर अत्यंत खडबडीत, केसाळ व उघडी असते.
◼️ रुंद व फुगीर कपाळ ही यांची ओळख आहे.
◼️ पाय लांब, मजबूत व राखाडी खुरांसह पातळ असतात.
◼️ पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके त्यांचे सौंदर्य वाढवतात.

वजन वाढ व उत्पादन
◼️ मांसाहारासाठी मडग्याळ जात सर्वोत्तम आहे
◼️ जन्मावेळी कोकराचे वजन साधारण ३.५ ते ४.५ किलो.
◼️ उत्तम आहारात वर्षभरात २० ते ३५ किलोपर्यंत पोहोचते.
◼️ पूर्ण वाढलेल्या नराचे वजन ४० ते ५० किलोपर्यंत असू शकते.
◼️ वयस्क मडग्याळ नर साधारणतः ५५ ते ६० किलो तर मादी ४० ते ४५ किलो वजनाची आढळते.

अर्थकारण
१० माद्या व १ नर यापासून सुरुवात केल्यास
◼️ विक्री : नर कोकरे सणांच्या वेळी २०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत विकली जातात.
◼️ पैदास : माडग्याळ मेंढी २ वर्षांतून ३ वेळा वेत देते.
◼️ खत : लेंडीखताच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
◼️ गोठा : कोरडा व हवेशीर असावा. एका मेंढीला १०-१२ चौरस फूट जागा लागते. जमीन लाकडी फळ्यांची असल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

- जिल्हा उपआयुक्त
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली

अधिक वाचा: भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदांचा निकाल जाहीर; इथे पहा विभागनिहाय नावांची यादी

Web Title : मडग्याळ भेड़: महाराष्ट्र की लोकप्रिय मांस नस्ल, उत्कृष्ट आर्थिक लाभ

Web Summary : सांगली, महाराष्ट्र में उत्पन्न मडग्याळ भेड़ें तेजी से वजन बढ़ने और उच्च गुणवत्ता वाले मांस के लिए जानी जाती हैं। अपनी अनूठी नाक और अनुकूलन क्षमता से पहचानी जाने वाली, वे मांस की बिक्री, प्रजनन और उर्वरक उत्पादन के माध्यम से प्रजनकों को महत्वपूर्ण आय प्रदान करती हैं। एक परिपक्व नर का वजन 50-60 किलोग्राम तक हो सकता है।

Web Title : Madgyal Sheep: Maharashtra's Popular Meat Breed with Promising Economic Returns

Web Summary : Madgyal sheep, originating in Sangli, Maharashtra, are known for rapid weight gain and high-quality meat. Distinguished by their unique nose and adaptability, they offer breeders significant income through meat sales, breeding, and fertilizer production. A mature male can weigh 50-60 kg.