कोल्हापूर : जिल्ह्यातील ९ हजार ४०० दूध संस्था कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची 'इएसआयसी' आरोग्य विमा योजना लागू झाली आहे.
यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटना गेली सहा वर्षे शासन पातळीवर प्रयत्नशील होती. विशेष म्हणजे या योजनेला कर्मचाऱ्यांच्या वयाची अट नाही व एक कर्मचारी असलेल्या संस्थाही यामध्ये सहभागी होऊ शकतात.
दूध संस्थांमध्ये अल्प पगारावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सकाळी व सायंकाळी दोन वेळा त्यांना हे काम करावे लागते. आयुष्य दूध संस्थेत खर्ची घातल्यानंतर आयुष्याच्या शेवटी हातात काहीच पडत नाही.
म्हणून संघटनेने किमान वेतन, भविष्य कल्याण निधी, कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. मात्र, आरोग्यासाठी 'इएसआयसी' आरोग्य विमा लागू करण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न केले होते.
कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला असा होणार लाभ
◼️ स्वतः कर्मचारी.
◼️ पत्नी व आई-वडील.
◼️ २५ वर्षापर्यंतचा मुलगा.
◼️ अविवाहित मुलगी, मानसिक व शारीरिक अपंग अपत्य आयुष्यभर.
◼️ महिला कर्मचाऱ्याचे सासू-सासरे.
◼️ अल्पवयीन भाऊ, बहीण.
इएसआयसी'साठी अशी होणार कपात
◼️ आरोग्य विम्यासाठी अत्यल्प मासिक हप्ता आहे.
◼️ ३.२५% (कर्मचाऱ्याचा पगार) संस्थेने भरायचे.
◼️ कर्मचाऱ्याच्या पगारातून ०.७५% कपात होणार.
अशी लागणार कागदपत्रे (सर्व झेरॉक्स)
◼️ दूध संस्थेचे पॅन कार्ड.
◼️ नोंदणी प्रमाणपत्र.
◼️ संस्था बँक पासबुक.
◼️ संस्था अध्यक्ष/सचिवांची संपूर्ण माहिती.
◼️ चालू पगारपत्र.
◼️ कर्मचाऱ्यांची यादी.
◼️ जवळच्या पोलिस ठाण्याचे नाव.
◼️ कर्मचाऱ्याचे पॅन कार्ड, बँक.
◼️ पासबुक, आधारकार्ड व कुटुंबातील पात्र व्यक्तींचे फोटो.
गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच दूध संस्था व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. - के. डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटना
अधिक वाचा: सरसेनापती कारखान्याचे १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल जमा; प्रतिटन किती रुपयाने केले पेमेंट?
