कोल्हापूर : राज्यातील दुधाचे दर कोसळल्यानंतर राज्य शासनाने गायदूधासाठी उत्पादकांना पाच व सात रुपये अनुदान दिले.
त्याची माहिती भरण्याची जबाबदारी राज्यातील दूध संघांवर सोपविली होती. त्यासाठी त्यांना प्रतिलिटर ५ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार राज्यातील संघांना ४ कोटी ५० लाख रुपये वर्ग करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 'गोकुळ' व 'वारणा' दूध संघाना ६१ लाख ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले आहेत.
गायीच्या दुधाचे उत्पादन वाढल्याने डिसेंबर २०२३ पासून दूध संघांनी खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च, तर जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत संघांनी खरेदी केलेल्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले.
त्यानंतरही खरेदी दरात वाढ न झाल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर ७ रुपये अनुदान दिले.
ही प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाने स्थानिक दूध संघांना प्रतिलिटर ५ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार राज्यातील संघांना ४ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील 'गोकुळ', 'वारणा', 'शाहू', 'स्वाभिमानी' सह इतर खासगी संघांनाही पैसे मिळाले आहेत.
यामध्ये 'गोकुळ'ला सर्वाधिक ४५ लाख, तर वारणा दूध संघाला सुमारे १६ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळाले आहे.
दृष्टिक्षेपात दूध उत्पादकांना मिळालेले अनुदान◼️ दूध उत्पादक - ५ लाख २५ हजार.◼️ अनुदानाची रक्कम - १,५८८ कोटी.◼️ कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले अनुदान - १०३ कोटी ९९ लाख.
अधिक वाचा: तुम्ही खाताय ते पनीर आहे की चीज अॅनालॉग? एकसारख्या दिसणाऱ्या या पदार्थांत नक्की काय आहे फरक?