Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

Taloda bull market sees turnover of over Rs 1 crore; 600 bulls sold in two days | तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त भरणाऱ्या बैल बाजारात यंदा ९०० बैलांची आवक झाली असून ती गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.  साहजिकच त्याचा उलाढालीवरही परिणाम झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बैल बाजारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती देण्यात आली. तळोदा शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली आहे.

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. कारण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यात्रेनंतरच सुरु होत असतो. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी यात्रेत बैल खरेदी करीत असतात जिल्ह्याबाहेरील व शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान राज्यातील व्यापारी हजेरी लावतात. बाजार समितीच्या पेठे ग्राउंडवर यंदाही बैल बाजार भरला आहे. बाजार समितीने जनावरे व व्यापान्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा साधारण १०० बैलांची आवक झाली असून त्यातील सोमवारी साधारण ४०० बैलांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बैलांची आवक कमी झाली आहे. कारण गेल्यावर्षी ११०० बैल विक्रीसाठी आले होते.

बैल बाजारातील सुविधांसाठी बाजार समितीचे सभापती आमदार राजेश पाडवी, उपसभापती अमोल भारती व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुभाष मराठे, संजय कलाल, हेमंत चौधरी, प्रसाद बैंकर, जय सूर्यवंशी, अजय चव्हाण, राहुल जावरे, धनराज मराठे, संदीप परदेशी परिश्रम घेत आहेत.

बैल बाजारात सोमवारी झालेल्या खरेदी-विक्रीतून साधारण एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. ८० हजार रुपयांना एक जोडी विक्री झाली असून या जोडीला सर्वाधिक किंमत मिळाल्याचेही सांगण्यात आले. असे असले तरी यंदा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैल बाजारात पाहिजे तशी तेजी नसल्याचेही सांगितले जाते. मात्र मोठ्या संख्येने रुबाबदार बैलजोडी विक्रीसाठी आल्या आहेत.

यात्रेतही गर्दी...

यंदा श्री कालिका मातेची यात्रा कॉलेज रोडवरील एका खाजगी जागेत भरविण्यात आली आहे. तेथे मनोरंजनासाठी मोठमोठे झुले, पाळणे यासह विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. भाविक मंदिरात श्री कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर यात्रेत हजेरी लावतात. शहरी व ग्रामीण भागातील भाविक यात्रेत हजेरी लावत आहेत.

बाजार समितीकडून व्यापाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध

• तळोदा शहरानजीकच्या पेठे ग्राऊंडवर बाजार समितीने बैल बाजार भरवला आहे. त्यासाठी समितीने व्यापारी, खरेदीदार व जनावरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

• बैलांसाठी पाण्याचा हौद उभारला असून व्यापाऱ्यांसाठी देखील पाण्याचे थंड जार उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय अतिशय स्वस्त दरात पोटभर जेवण उपहारगृहात उपलब्ध करून दिले आहे.

• जनावरांसाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र वैद्यकीय पथक तैनात केले असून या पथकाने जनावरांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले होते. याशिवाय रात्री विजेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे व्यापान्यांनीही बाजार समितीच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

बैल बाजारात यंदा बैलांची चांगली आवक आली आहे. त्यासाठी बाजार समितीकडून व्यापारी व जनावरांना इतर सुविधांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. - सुभाष मराठे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, तळोदा.

लांबच्या बैल व्यापाऱ्यांची संख्या कमी

• एरवी यात्रेत लांब अंतरावरून येणाऱ्या बैल व्यापाऱ्यांची संख्या यंदा प्रचंड रोडावली असल्याचे दिसून येते. कारण तेथून बैलांना इकडे विक्रीसाठी वाहनातून आणताना प्रचंड कसरत करावी लागत असते.

• पोलिसांकडूनही धरपकडच्या कारवाईस सामोरे जावे लागते. वास्तविक बाजार समितीची पावती दिलेली असताना त्यास केराची टोपली दाखवून कारवाई केली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

• यासाठी वरिष्ठ प्रशासनाने दखल घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा तळोदा येथील या बैल बाजारास घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. बैल बाजारामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो.

• बैलांसाठी लागणारा चारा, वैरणाची विक्री करण्यात येते. आठ-दहा दिवस भरणाऱ्या या बैल बाजारामुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्नही सुटतो.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

Web Title : तलोदा बैल बाजार में ₹1 करोड़ का कारोबार; 600 बैल बिके

Web Summary : खानदेश में प्रसिद्ध तलोदा बैल बाजार में दो दिनों में 600 बैल बिकने से ₹1 करोड़ का कारोबार हुआ। कालिका माता यात्रा के हिस्से के रूप में, बाजार में गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान के व्यापारी आए, हालाँकि पिछले साल की तुलना में बैलों की आवक थोड़ी कम रही।

Web Title : Taloda Bull Market Sees ₹1 Crore Turnover; 600 Bulls Sold

Web Summary : The Taloda bull market, famous in Khandesh, saw a turnover of ₹1 crore with 600 bulls sold in two days. The market, part of the Kalika Mata Yatra, attracted traders from Gujarat, Madhya Pradesh and Rajasthan, despite a slight decrease in bull arrivals compared to last year.