lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

Take care of the health of livestock; There will be loss of money due to infection | आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

राज्यात एफ एम डी पशुपालकांच्या उंबरठ्यावर

राज्यात एफ एम डी पशुपालकांच्या उंबरठ्यावर

शेअर :

Join us
Join usNext

सध्या अनेक भागात लाळ खुरकत अर्थात एफ एम डी हा पशुधनातील संसर्ग जन्य आजार वर डोके काढत आहे. एकीकडे कमी दूध दरांमुळे आधीच तोट्यात असलेल्या पशुपालकांवर एफ एम डी मुळे नवीन संकट निर्माण झाले आहे. तर वेळेत उपचार आणि सावधानता बाळगून हा आजार रोखता येईल असे पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात.  

उन्हाळात अनेकदा बर्‍याच जनावरांच्या तोंडावाटे लाळ येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. पण उन्हाच्या तडाख्याने होत असेल अशी समजूत करून शेतकरी याकडे कानाडोळा करतात. मात्र पुढे जाऊन या दुर्लक्षाचे विपरीत परिणाम दिसून येतात. 

पशुधनाच्या तोंडावाटे लाळ येणे, अंगावरील केस वेडे वाकडे होणे, खुरांमध्ये जखम्या होणे ही सर्व लक्षणे एफ एम डी म्हणजेच लाळ खुरकत झाल्याची असते. यातून जनावरे जीवंत तर राहतात मात्र बैल पूर्णक्षमतेने कष्ट करू शकत नाही, गायदूध देऊ शकत नाही तसेच अनेकदा वारंवार उलटण्याची शक्यता निर्माण होते. 

पशुधनातील लाळ खुरकत आजार FMD : लक्षणे आणि सविस्तर उपाय

कसा पसरतो लाळ खुरकत

लाळ खुरकत हा साथीचा आजार आहे. जो पशुधनात बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने होतो. जनावरांचे बाजार, चरण्याचे कुराण, तर गोठ्यात आलेल्या नवीन जनावरांमार्फत हा आजार पसरतो. 

तुमच्या गोठ्यात येण्यापासून कसा रोखाल लाळ खुरकत 

सध्या राज्याच्या अनेक भागात लाळ खुरकत मोठ्या प्रमाणात सुरू असून या पासून आपल्या पशुधनाला वाचविण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकता. 

१) जनावरांच्या बाजारातुन नवीन खरेदी करणे टाळावे. 
२) आपल्या गोठ्यातील जनावरे चरायला जात असतील तर जेथे त्या आधी दुसरी जनावरे चरलेली नसावी.
३) लक्षणे आढल्यास वेळीच उपचार करावेत. दिरंगाई करू नये.
४) गोठ्यात स्वछता राखावी. 
५) जनावरांना नियमित संतुलित आहार द्यावा. तसेच सोबत खनिज मिश्रण द्यावे.  

Web Title: Take care of the health of livestock; There will be loss of money due to infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.