कोपर्डे हवेली: अलिकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याने जिरायती क्षेत्र कमी होत आहे.
परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात शाळू पिकाऐवजी गहू, मका आणि हरभरा या पिकांचे उत्पादन घेतले.
त्यामुळे शाळू पिकाचे क्षेत्र घटले असून, शाळूच्या कडब्याचे दर वाढले आहेत. सध्या एका पेंडीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.
सध्या शाळू पिकाची कापणी व खुडणी सुरू आहे. पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी कडब्याच्या शोधात आहेत.
गेल्या आठ दिवसांत काढण्यात आलेल्या कडब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कडब्याचे दर वाढले असून, दोन आळ्यांच्या एका पेंडीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.
जिल्ह्यातील खटाव, माण तसेच कराड उत्तर विभागातील पूर्व भागात शाळू पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र गतवर्षाच्या तुलनेत यंदा गहू, मका आणि हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढले आहे.
शाळू पिकाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत असून, त्या मानाने उत्पादन मिळत नाही. तसेच या पिकासाठी मजुरांची टंचाईही भासत आहे. भांगलणी, काढणी, खुडणी, वाळवणी आणि कडब्याच्या पेंड्या बांधणे यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शाळू कडब्याचे आगर म्हणून ओळखले जाते. तेथून काही शेतकरी कडबा आणतात.
मात्र यंदा तेथील दरही वाढले आहेत. सध्या तेथे एका पेंडीचा दर २५ ते ३० रुपये असून, वाहतूक खर्च वाढल्याने तो परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कडब्याच्या दरगतवर्षी कडब्याच्या एका पेंडीचा दर २५ ते ३० रुपये होता. यंदा तो वाढून ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
दर वाढण्याची कारणे◼️ बागायती क्षेत्रातील शेतकरी ऊस गेला की, लगेच वैरणीची व्यवस्था करतात.◼️ यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने फेब्रुवारी महिन्यात साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होते.◼️ त्यामुळे शेतकऱ्यांना वैरणीची व्यवस्था करता आली नाही.◼️ त्यातच शाळू पिकाचे क्षेत्र घटल्याने कडब्याची मागणी वाढली आहे.
पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी शाळू कडब्याची खरेदी करावी लागते. ओल्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा पोषक असतो. सध्या दर वाढले असले तरी कडबा घ्यावाच लागेल. - मारुती चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली
शाळू पिकाला कष्ट जास्त असतात; मात्र त्यानुसार दर मिळत नाहीत. यंदा तरी कडब्याला चांगला दर मिळत आहे. - कैलास पोळ, शेतकरी, शामगाव
अधिक वाचा: शेतजमिनी अजून महाग होणार; पुढील आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण भागातही रेडीरेकनर दर वाढणार?
Web Summary : Reduced sorghum cultivation due to increased irrigation and crop shifts has driven up fodder prices. A bundle now costs ₹35-40. Farmers seek fodder amid shortages and rising production costs, impacting livestock feed availability.
Web Summary : सिंचाई और फसल परिवर्तन के कारण ज्वार की खेती में कमी से चारे के दाम बढ़ गए हैं। अब एक बंडल की कीमत ₹35-40 है। किसान चारा की कमी और बढ़ती उत्पादन लागत के बीच चारा तलाश रहे हैं, जिससे पशुधन फ़ीड उपलब्धता प्रभावित हो रही है।