Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

Sheep farming? Which breed produces more wool and meat? | Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत.

शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत. यात मेंढ्याच्या देशी व विधेशी जाती आहेत त्या पाहूया.

मेंढीच्या उपयुक्त देशी जाती
१) दख्खनी

- महाराष्ट्र राज्याच्या कोरडवाहू प्रदेश आणि सभोवतालच्या आंध्रप्रदेश व कर्नाटकातील भागात या दख्खनी मेंढ्या आढळतात.
- या जातीच्या मेंढ्या मांस व लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध असून लोकर ओबड-धोबड असते.
- शरीरबांधा लहान मध्यम व काटक असतो.
- शरीराचा रंग पांढरा, तपकिरी काळपट आढळतो.
- मेंढ्या बिनशिंगी तर नरामध्ये शिंगे आढळतात.
- जनावरांचे कान लहान असून खाली लोंबकळणारे असतात.
- रोमन आकाराचे नाक असून मान आखूड व पात्तळ असते.
- जनावराची छाती किंचित झुकलेली असते तर शेपटी आखूड असते.
- नराचे शरीर वजन ३५ ते ४० किलो तर मादीचे वजन ३० किलो इतके आढळते.
- लोकर ओबड-धोबड व काहीशी केसाळ असून उत्पादन ०.५ किलो प्रतिवर्षी इतकी आढळते.
- दख्खनी मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरीपासून प्रामुख्याने घोंगड्या, कांबळ तयार करतात.

२) नेल्लोर
-
या जातीच्या मेंढीचे मूळ स्थान आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील असून सध्या ही जनावरे नेल्लोर, गुड्डापा, गुंटूर, नालगोंडा हे जिल्हे आणि भोवतालच्या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात.
- भारतातील मेंढ्याच्या जातीमध्ये सर्वात जास्त उंची असणारी जनावरे नेल्लोर जातीचीच आहेत.
- या जातीची शिंग पिळदार, वेटोळेयुक्त असतात.
- लोंबकळनारे लांब कान, लांबट चेहरा असून प्रौढ जनावराचे शरीर वजन ३० किलो मादी व ४५ किलो नरचे आढळते.
- नेल्लोर मेंढी मुख्यतः मटणासाठी प्रसिद्ध आहे.

३) माडग्याळ
-
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावाच्या सभोवताली सिद्धनाथ, कवठे महांकाळ या भागात या मेंढ्या आढळतात.
- दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, बाकदार नाक, लांब मान रंगाने पांढऱ्या असतात.
- पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो असते. मेंढ्यांच्या अंगावर लोकर कमी असते.

मेंढीची विदेशी जात
मेरीनो

- ही जात प्रामुख्याने लोकरीसाठी प्रसिद्ध आहे.
- हिचे मूळ स्थान स्पेन देशातील असून विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत प्रामुख्याने आढळते.
- मेरीनो मेंढ्या उच्च प्रतीच्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत.
- या मेंढ्यांची लोकर तेलकट असते.
- नरापासून दरवर्षी १२ ते १५ किलो लोकरीचे उत्पादन मिळते.

अधिक वाचा: जनावराचे दुध उत्पादन वाढवून त्यांना निरोगी ठेवायचं मग तयार करा ह्या प्रकारचा गोठा

Web Title: Sheep farming? Which breed produces more wool and meat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.