Join us

शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:10 IST

shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

महत्वाचे१) योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.२) योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.३) लाभार्थी निवडताना ३० टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)५) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील)योजनेसाठी अर्थसहाय्य अ) शेळ्यांसाठी

तपशीलदर (रक्कम रुपयात)१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
शेळ्या खरेदी८,०००/- प्रति शेळी (उस्मानाबादी, संगमनेरी जातीच्या पैदासक्षम)६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम)८०,०००/- (१० शेळ्या)६०,०००/- (१० शेळ्या)
बोकड खरेदी१०,०००/- एक बोकड (उस्मानाबादी/संगमनेरी जातीचा नर)८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर)१०,०००/- (१ बोकड)८,०००/- (१ बोकड)
शेळ्या व बोकडाचा विमा (तीन वर्षासाठी)१२.७५% (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १३,५४५/- (उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी)रु १०,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी)
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य, चाऱ्यावरील खर्च)लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित-
एकूण खर्च १,०३,५४५/- (उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी)७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी)

ब) मेंढ्यांसाठी

तपशीलदर (रक्कम रुपयात)१० मेंढ्या व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
मेंढ्या खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ)८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम)१,००,०००/- (१० मेंढ्या)८०,०००/- (१० मेंढ्या)
नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर)१२,०००/- (१ नरमेंढा)१०,०००/- (१ नरमेंढा)
मेंढ्या व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी)१२.७५% (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु. १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी)रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी)
मेंढ्या व्यवस्थापण (खाद्य, चाऱ्यावरील खर्च)लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित-
एकूण खर्च १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी)१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी)

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणेगट - दख्खनी व अन्य स्थानिक जातीप्रवर्ग - अनु. जाती व जमातीएकूण किंमत - १,०३,५४५/-शासनाचे अनुदान- ७७,६५९/-लाभार्थ्याचा स्वहिस्सा - २५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)२) * सातबारा (अनिवार्य)३) * ८ अ उतारा (अनिवार्य)४) * अपत्य दाखला (अनिवार्य)/स्वयंघोषणा पत्र५) * आधारकार्ड (अनिवार्य)६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)८) * रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. (अनिवार्य)९) * ७-१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)१०) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.१४) वय-जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत.१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत.१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

अर्ज करण्याचा कालावधी०२ मे ते ०१ जून २०२५.

अर्ज कसा कराल?- https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला किंवा गुगल प्लेस्टोर वरून AH-MAHABMS मोबाईल अॅप डाउनलोड करा.- टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करा.- नंतर अर्जदार आवश्यक माहिती भरून नोंदणी करू शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क- पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती/जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी/जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.- कॉल सेंटर संपर्क 1962 (7am to 6pm)- तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया 8308584478 (10am to 6pm) या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

अधिक वाचा: जनावरांचा गोठा बांधण्याआधी या बाबींचा विचार करा; होईल मोठा फायदा

टॅग्स :शेळीपालनमहाराष्ट्रशेतीराज्य सरकारसरकारदुग्धव्यवसायऑनलाइनमोबाइलकृषी योजनासरकारी योजनाशेतकरी