Join us

Milk Competition : तुमची गाय, म्हैस १२ लीटर दूध देते का? तर 'या' स्पर्धेत भाग घ्या आणि बक्षीस जिंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:59 IST

जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाय व - म्हैशींसाठी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार असून, स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी (Milk Producer) सहभाग घ्यावा, असे आवाहन योगेश गोडबोले यांनी पत्रकातून केले आहे.

कोल्हापूर : सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने (गोकुळ) जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाय व - म्हैशींसाठी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार असून, स्पर्धेत जास्तीत जास्त दूध - उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी पत्रकातून केले आहे.

'गोकुळ'च्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपापल्या संस्थेच्या पत्रावर बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात ९ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे कार्यकारी संचालक गोडबोले यांनी पत्रकात म्हटले आहे.

म्हैस दूध प्रतिदिनी १२ लिटर बंधनकारक

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैशीने प्रतिदिनी किमान १२ लिटर, तर गायीने २० लिटर दूध देणे बंधनकारक आहे.

असे आहे बक्षीस.....

क्रमांक म्हैसगाय
प्रथम३५ हजार२५ हजार
द्वितीय३० हजार२० हजार
तृतीय२५ हजार१५ हजार

हेही वाचा : Animal Care In Winter : हिवाळ्यात 'अशी' घ्या दुभत्या जनावरांची काळजी

टॅग्स :दूधशेतकरीगायदुग्धव्यवसायकोल्हापूरगोकुळशेती क्षेत्र