Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Pashudhan Scheme: राज्यात 'पशुधन' योजनेची धूम! अर्जाचा आकडा लाखाच्या पुढे वाचा सविस्तर

Pashudhan Scheme: राज्यात 'पशुधन' योजनेची धूम! अर्जाचा आकडा लाखाच्या पुढे वाचा सविस्तर

latest news Pashudhan Scheme: 'Pashudhan' scheme booming in the state! Number of applications exceeds one lakh Read in detail | Pashudhan Scheme: राज्यात 'पशुधन' योजनेची धूम! अर्जाचा आकडा लाखाच्या पुढे वाचा सविस्तर

Pashudhan Scheme: राज्यात 'पशुधन' योजनेची धूम! अर्जाचा आकडा लाखाच्या पुढे वाचा सविस्तर

Pashudhan Scheme : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. वाचा सविस्तर (Pashudhan Scheme)

Pashudhan Scheme : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. वाचा सविस्तर (Pashudhan Scheme)

शेअर :

Join us
Join usNext

संतोष वानखडे

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. (Pashudhan Scheme)

दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन आणि इतर प्राणिपालन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करता यावी, यासाठी शासनाकडून अनुदानाचा हात पुढे करण्यात आला आहे. (Pashudhan Scheme)

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरु केलेल्या विविध योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  २२ मेपर्यंत राज्यभरातून एकूण १ लाख ८२ हजार ०७७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.

विविध योजनांमध्ये दुधाळ गायी/म्हशी, शेळी/मेंढी, मांसल कुक्कुट पक्षी, तलंगा गट व सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट अशा योजनेचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जून २०२५ असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 शेवटच्या टप्प्यात अर्ज संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असून लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

अनुदानाचे प्रमाण

  • अनुसूचित जाती व जमातीसाठी: ७५% अनुदान

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ५०% अनुदान

राज्यस्तरीय योजनांवरील अर्ज (एकूण)

योजनाअर्ज संख्या
दुधाळ गायी/म्हशी वाटप६४,७९२
शेळी/मेंढी वाटप५२,७८४
१००० मांसल कुक्कुट पक्षी१३,०५८

जिल्हास्तरीय योजनांवरील अर्ज

योजनाअर्ज संख्या
दुधाळ गायी/म्हशी वाटप२०,६६४
शेळी/मेंढी वाटप२२,०१७
तलंगा गट वाटप४,४९४
सुधारित पक्ष्यांच्या पिलांचे गट४,२६८

टॉप १० जिल्हे

जिल्हाअर्ज संख्या
बीड१९,६२५
अहिल्यानगर१४,३२३
सोलापूर११,३३६ 
बुलढाणा१०,७४१
जालना१०,११५
यवतमाळ८,८५३
पुणे७,४९९
छ. संभाजीनगर७,३५५
परभणी६,७४३
नांदेड६,५७५

हे ही वाचा सविस्तर : Animal Care Tips: पशुधनाचा उष्मापासून कसा कराल बचाव; जाणून घ्या उपाययोजना सविस्तर

Web Title: latest news Pashudhan Scheme: 'Pashudhan' scheme booming in the state! Number of applications exceeds one lakh Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.