Lasalgaon Kanda Market : सर्व पशुपालक, शेळीपाळ, मेंढपाळ व व्यापारी बांधव यांना कळविण्यात येते की, उपबाजार आवार, निफाड येथे शुक्रवार ०४ ऑक्टोंबर २०२५ पासुन शेळ्या, मेंढ्या व जनावरे यांची खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात शुक्रवारी शेळी, मेंढी, बोकड या पाळीव जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी आपली छोटी-मोठी जनावरे जनावरे लिलाव शुभारंभाच्या पहिल्या दिवशी आणली होती. पाच वर्षापासून बंद असलेला हा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून बाजार समितीचे अभिनंदन होत आहे.
पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. त्यानुसार आता सर्व पशुपालक, शेळीपाळ, मेंढपाळ व व्यापारी बांधवांनी आपल्या शेळ्या, मेंढ्या व जनावरे उपबाजार आवार, निफाड येथे विक्रीस आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. शेळ्या, मेंढ्या व जनावरे बाजाराचा वार व वेळ दर शुक्रवारी सकाळी साडे सात ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
करोना काळापासून बंद अस-लेला पशू खरेदी-विक्री बंद होता. शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीमुळे हा लिलाव आजपासून सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी जनावरे खरेदी करण्यासाठी निफाड, कसबे सुकेणे, लासल-गाव, पिंपळगाव बसवंत, ओझर व जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांनी हजेरी लावली.