Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Melghati Buffalo : विदर्भाच्या पशुधनाला ऐतिहासिक ओळख; मेळघाटी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन वाचा सविस्तर

Melghati Buffalo : विदर्भाच्या पशुधनाला ऐतिहासिक ओळख; मेळघाटी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन वाचा सविस्तर

latest news Melghati Buffalo: Vidarbha's livestock gets historical recognition; Melghati buffalo gets national ranking Read in detail | Melghati Buffalo : विदर्भाच्या पशुधनाला ऐतिहासिक ओळख; मेळघाटी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन वाचा सविस्तर

Melghati Buffalo : विदर्भाच्या पशुधनाला ऐतिहासिक ओळख; मेळघाटी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन वाचा सविस्तर

Melghati Buffalo : विदर्भाच्या सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम मेळघाट भागात पिढ्यानपिढ्या संगोपनात असलेल्या मेळघाटी म्हशीला अखेर राष्ट्रीय स्तरावर अधिकृत जात म्हणून मान्यता मिळाली आहे. ICAR कडून मिळालेल्या या मानांकनामुळे स्थानिक पशुपालकांसाठी नव्या संधींची दारे उघडली असून, विदर्भाच्या पशुधन परंपरेला देशपातळीवर ओळख मिळाली आहे. (Melghati Buffalo)

Melghati Buffalo : विदर्भाच्या सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम मेळघाट भागात पिढ्यानपिढ्या संगोपनात असलेल्या मेळघाटी म्हशीला अखेर राष्ट्रीय स्तरावर अधिकृत जात म्हणून मान्यता मिळाली आहे. ICAR कडून मिळालेल्या या मानांकनामुळे स्थानिक पशुपालकांसाठी नव्या संधींची दारे उघडली असून, विदर्भाच्या पशुधन परंपरेला देशपातळीवर ओळख मिळाली आहे. (Melghati Buffalo)

Melghati Buffalo : विदर्भाच्या डोंगराळ मेळघाट परिसरात पिढ्यानपिढ्या संगोपनात असलेल्या मेळघाटी म्हशीला अखेर राष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे.(Melghati Buffalo)

महाराष्ट्रातील नागपुरी, पंढरपुरी आणि मराठवाडी पूर्णाथडी या नोंदीकृत म्हशींच्या जातींमध्ये आता विदर्भातील स्थानिक मेळघाटी म्हशीचाही समावेश झाला असून, यामुळे पशुपालकांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे.(Melghati Buffalo)

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या वतीने १४ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांना मेळघाटी म्हशीचे पंजीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.(Melghati Buffalo)

यावेळी आयसीएआरचे वरिष्ठ अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव, तसेच राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संसाधन ब्युरोचे मान्यवर उपस्थित होते.(Melghati Buffalo)

या प्रसंगी कुलगुरू डॉ. पाटील यांनी या यशामागे योगदान देणाऱ्या पशु वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे तसेच प्रकल्प संशोधक डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्रवीण बनकर आणि डॉ. प्राजक्ता कुरळकर यांचे विशेष अभिनंदन केले.(Melghati Buffalo)

मेळघाटी म्हशीची वैशिष्ट्ये

अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम मेळघाट भागात, विशेषतः धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये, भटक्या आदिवासी व गवळी समाजाकडून मेळघाटी म्हशीचे संगोपन केले जाते. स्थानिक भाषेत तिला 'पहाडी म्हैस' असेही म्हटले जाते.

काळा कुळकुळीत रंग, केसाळ कातडी, मध्यम आकाराची वरच्या व आतल्या बाजूने वळणारी वक्राकार शिंगे आणि सपाट कपाळ हे तिचे प्रमुख बाह्यरूप लक्षणे आहेत.

दूध उत्पादनातही सरस

मेळघाटी म्हशीची उत्पादन व पुनरुत्पादन क्षमता उत्तम असून, ती डोंगराळ व कठीण भौगोलिक परिस्थितीत सहज जुळवून घेते.

या म्हशीच्या दुधातील स्निग्धांश सरासरी ७ टक्के असून, त्यापासून तयार होणारा खवा व तूप स्थानिक बाजारपेठेत विशेष मागणीचा आहे. मेळघाटी म्हशीच्या खव्याला स्वतंत्र ओळख मिळालेली आहे.

पशुपालकांना मोठा लाभ

मेळघाटी म्हशीला अधिकृत जात म्हणून मान्यता मिळाल्यामुळे पशुपालकांना शासनाच्या विविध योजना, अनुदान, संवर्धन व सुधार प्रकल्पांचा थेट लाभ मिळणार आहे.

तसेच या स्थानिक जातीचे जतन, संवर्धन आणि शास्त्रीय पद्धतीने वाढीस चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एकंदरीत, मेळघाटी म्हशीच्या राष्ट्रीय मानांकनामुळे विदर्भाच्या पशुधन परंपरेला नवी ओळख मिळाली असून, स्थानिक पशुपालकांसाठी ही मान्यता आर्थिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर :Doodh Ganga Project : यवतमाळच्या शेतकऱ्यांसाठी मोठी संधी; दुधाळ जनावरांवर ७५% अनुदान वाचा सविस्तर

Web Title : मेलघाटी भैंस को राष्ट्रीय पहचान: विदर्भ के पशुधन को बढ़ावा।

Web Summary : मेलघाटी भैंस को राष्ट्रीय स्तर पर मिली पहचान, विदर्भ के पशुपालकों के लिए गर्व का क्षण। उच्च वसा वाले दूध और कठिन इलाकों के अनुकूल होने के लिए जानी जाने वाली, यह मान्यता स्थानीय समुदायों के लिए सरकारी लाभ और संरक्षण प्रयासों को खोलती है।

Web Title : Melghati Buffalo gets National Recognition: A boost to Vidarbha's livestock.

Web Summary : Melghati buffalo recognized nationally, a moment of pride for Vidarbha's herders. Known for high-fat milk and adaptability to tough terrain, this recognition unlocks government benefits and conservation efforts for local communities.