दुधाळ जनावरांना विविध आजार जसे की कासदाह (mastitis), मस्टाटीस (mastitis) किंवा इतर जंतूसंक्रमण होऊ शकतात. या आजारांमध्ये जनावरांचे दुध उत्पादन कमी होते तसेच दुधाची गुणवत्ता खराब होऊ शकते.
दरम्यान अशावेळी सतत काही दिवस उपचार करून देखील जनावरे योग्य प्रकारे ठिक होत नाहीत तेव्हा या आजारग्रस्त दुधाळ जनावरांच्या दुधाची तपासणी करणे खूप महत्त्वाचे ठरते.
याच अनुषंगाने जाणून घेऊया जनावरांच्या दूध तपासणीचे विविध फायदे तसेच दूध तपासणी का गरजेची आहे याविषयी सविस्तर माहिती.
दूध तपासणी का गरजेचे आहे?
दुधाची गुणवत्ता तपासणी : दूध आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे त्यातील एकही प्रकारची गडबड होणे म्हणजे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते. यासाठी जनावरांच्या दूधाची तपासणी करून त्यात कोणतेही जंतू, बॅक्टेरिया किंवा इतर हानिकारक घटक आहेत का? हे समजून घेणे गरजेचे आहे. मस्टाटीस सारख्या आजारांमुळे दुधातील घटक बदलू शकतात. यामुळे दूध पोषक तत्वांचा अपव्यय होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो.
आजारांचा तातडीने शोध : कासदाह किंवा मस्टाटीस सारख्या आजारांमुळे जनावरांच्या दुधाची गुणवत्ता कमी होऊ शकते. या आजारांमध्ये जंतू दुधात मिसळू शकतात ज्यामुळे दुधाची तपासणी केल्यास याचा तातडीने शोध घेता येतो आणि लवकरात लवकर उपचार सुरू करता येतात.
पोषक घटकांची संतुलन तपासणी : दूध तपासल्यामुळे दूधातील पोषक घटकांची मात्रा जसे की प्रोटीन, फॅट, लॅक्टोज इत्यादी तपासली जाऊ शकते. यामुळे पशुपालकांना जनावरांच्या आहाराची योग्य माहिती मिळते आणि दुधाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतात.
दूध तपासणीचे फायदे
कासदाह किंवा मस्टाटीसवर नियंत्रण : दूध तपासणी करून कासदाह (mastitis) आणि इतर संक्रमणाची माहिती मिळवून पशुपालक लवकर उपचार सुरू करू शकतात ज्यामुळे जनावरांचे दुध उत्पादन पुन्हा सुरळीत होऊ शकते. तसेच अतिरिक्त खर्च वाचू शकतो.
दुधाच्या गुणवत्ता सुधारणा : दूधाची नियमित तपासणी केल्याने दुधातील योग्य घटकांची मात्रा किंवा इतर गडबडी शोधता येत जेणेकरून दुधाची गुणवत्ता टिकवता येते.
जनावरांची आरोग्य स्थिती तपासणी : दूध तपासणी करून जनावरांच्या एकूण आरोग्य स्थितीबद्दल माहिती मिळते.
डॉ. असरार अहमद
सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन
(विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर).
हेही वाचा : खर्च अन् वेळेत होईल बचत; रक्त तपासणीतून कळेल जनावरांच्या आजाराचे नेमके कारण