lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

It is mandatory to ear tag all the livestock in the state and register them with the bharat Pashudhan System | राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे यासाठी सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे.

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे यासाठी सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे तसेच, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करुन त्यायोगे पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.

पशुधनाचे ईअर टॅगिंग बद्दल नियम व सूचना

  • दि.३१.०३.२०२४ पर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येत आहे. त्यानुसार भारत पशुधन प्रणालीवर सदर माहिती अद्ययावत करण्यात यावी.
  • दि. ०१.०६.२०२४ नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नाही.
  • दि.१.०६.२०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत.
  • जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या (Forceful Culling) पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही.
  • नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
  • राज्यातंर्गत विक्रीकरिता वाहतुक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे.
  • पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
  • राज्यात विक्रीकरिता येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.
  • पशुधनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. दि. ०१.०४.२०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही.
  • दि.०१.०६.२०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी.
  • पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा (Owner Transfer) बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील.
  • ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा.

Web Title: It is mandatory to ear tag all the livestock in the state and register them with the bharat Pashudhan System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.