lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > गाय माजावर आली असेल तर ही काळजी घ्या? होईल मोठा फायदा

गाय माजावर आली असेल तर ही काळजी घ्या? होईल मोठा फायदा

how to care if the cow has come to heat? It will be a big benefit | गाय माजावर आली असेल तर ही काळजी घ्या? होईल मोठा फायदा

गाय माजावर आली असेल तर ही काळजी घ्या? होईल मोठा फायदा

गाय कमी दूध देते, प्रत्येक वेताला नराचीचं पैदास होते, अनेकदा भरवून देखील गाय गाभ राहत नाही, वासरांची वाढ होत नाही, गाय दिवसभर चारा खाते तरीही निरोगी दिसत नाही अशा कित्येक अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज येत असतात.

गाय कमी दूध देते, प्रत्येक वेताला नराचीचं पैदास होते, अनेकदा भरवून देखील गाय गाभ राहत नाही, वासरांची वाढ होत नाही, गाय दिवसभर चारा खाते तरीही निरोगी दिसत नाही अशा कित्येक अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज येत असतात.

शेअर :

Join us
Join usNext

गाय कमी दूध देते, प्रत्येक वेताला नराचीचं पैदास होते, अनेकदा भरवून देखील गाय गाभ राहत नाही, वासरांची वाढ होत नाही, गाय दिवसभर चारा खाते तरीही निरोगी दिसत नाही अशा कित्येक अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज येत असतात. बहुतांशी शेतकऱ्यांकडे असलेल्या गाई साधारण एका दिवसाला फक्त १० ते १५ लिटर दुध देतात त्यात हि वातावरण बदल झाला किंवा चारा बदल झाला तर अवघे ८ ते १० लिटर दुध प्रति दिवस देतात. त्यात दुधाला चांगला भाव मिळत नाही. अशा वेळी शेतकरी मेटाकुटीला आलेला असतो. मात्र शेतकऱ्यांनी कमी गाईंपासून अधिकाधिक दूध मिळवले तर दुधाला कमी दर असतांना देखील शेतकरी नफा कमवू शकतो आणि शेतकरी सुखी होऊ शकतो ते कसं हे आपण आज बघूया.

सेक्स सॉर्टेड सीमेन
आज बाजारात विविध लिंग वर्गीकृत वीर्य कांड्या उपलब्ध आहेत. या कांड्यांच्या वापरामुळे गाईला ९५% कालवड होऊ शकते. तसेच ही कालवड पुढिल एका वर्षात गाय होऊन दूध देते व होणारी कालवड हि आईच्या तुलनेत अधिक दूध देणारी तयार होते. त्यामुळे सतत नवनवीन गाई खरेदी करतांना शेतकऱ्यांची होणारी दमछाक थांबेल. तसेच ब्रुसोलिसिस आणि गाभ न जाणे आदी समस्यांना हि कालवड प्रतिकारक असल्याने या कालवडीचे संगोपन केल्यास शेतकऱ्याना कमी गाईंमध्ये अधिक दूध उत्पादन मिळू शकते सोबत गाय संगोपनाचा खर्च कमी होतो. 

अधिक वाचा: गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्र

रेतन नोंदी व रेतन वेळ
कृत्रिम रेतन करतांना शक्यतो ते सकाळी किंवा सांयकाळी करावे. तसेच रेतन करतेवेळी वापरलेल्या विर्य कांडीची माहिती टिपून ठेवावी सोबत रेतन केल्याची तारीख लिहून ठेवावी. ज्यामुळे त्यानंतर ७५ दिवसांनी आपण ती गाय गाभण आहे की नाही याची पशुवैद्यकीय सहायक यांच्या कडून खात्रीकरून घेऊ शकतो. 

जंत निर्मूलन व सकस आहार
गाई दर तीन महिन्याने व कालवडीना दर महिन्याला जंतनाशक देणे गरजेचे असते यातून त्यांच्या शरीरात असलेल्या जंतांचा नायनाट होतो व गाय व कालवड यांची प्रकृती स्थिर राहते. तसेच हे जंतनाशक देतांना शकतो दर महिन्याला वेगवेगळे घटक असलेले जंतनाशक दिले जायला हवे. ज्यामुळे शरीराला ठराविक एका घटकाची सवय होत नाही.  सोबतचं आपल्याकडील दुधाळ जनावरांना दिवसभरात वेगवेगळा चारा देणे गरजेचे आहे. एकदल द्विदल असे चारा नियोजन केले तर दुधाळ जनावरे अधिकाधिक दूध निर्माण करू शकतात. गाई व वासरांना नियमित जंतनाशक व सकस आहार असेल तर त्या वेळोवेळी माज दाखवतात व यातून त्यांचा भाकड काळ कमी होतो.

डॉ. बी. एफ. शिंदे 
निवृत्त सहा. पशुधन विकास अधिकारी, अहमदनगर 
9822199313

Web Title: how to care if the cow has come to heat? It will be a big benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.