Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > बायपास प्रोटीन अन् फॅट नेमके जनावरांच्या आहारात किती महत्त्वाचे आणि का? वाचा सविस्तर

बायपास प्रोटीन अन् फॅट नेमके जनावरांच्या आहारात किती महत्त्वाचे आणि का? वाचा सविस्तर

How important are bypass proteins and fats in animal diets and why? Read in detail | बायपास प्रोटीन अन् फॅट नेमके जनावरांच्या आहारात किती महत्त्वाचे आणि का? वाचा सविस्तर

बायपास प्रोटीन अन् फॅट नेमके जनावरांच्या आहारात किती महत्त्वाचे आणि का? वाचा सविस्तर

दुग्धोत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जनावरांच्या आहाराकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणुनच त्यांचा आहार परिपूर्ण, संतुलित राहील यावर भर द्यावा.

दुग्धोत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जनावरांच्या आहाराकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणुनच त्यांचा आहार परिपूर्ण, संतुलित राहील यावर भर द्यावा.

शेअर :

Join us
Join usNext

दुग्धोत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जनावरांच्या आहाराकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणुनच त्यांचा आहार परिपूर्ण, संतुलित राहील यावर भर द्यावा.

जनावरांच्या आहरात प्रक्रिया केलेला खुराक, चारा, बायपास प्रोटीनयुक्त आहार, बायपास स्निग्धांशयुक्त आहार जनावरांना द्यावा. आपण माहिती करुन घ्यावयाची आहे ती बायपास प्रोटीनयुक्त आहाराची जो की आपण दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी संकरित गाईना देतो.

बायपास प्रोटीन
◼️ रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रूमेन मधील जीवाणू खाद्यातील जवळपास ५० ते ६० टक्के प्रथिनांचे विघटन अमोनिया मध्ये करीत असतात.
◼️ त्यापैकी थोडा अमोनिया वापरुन जीवाणू स्वतःकरिता प्रथिनांची निर्मिती करतात व उर्वरित अमोनिया जनावराच्या लिव्हरमध्ये युरीयामध्ये रूपांतरित होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकला जातो.
◼️ अशा प्रकारे जनावरांच्या खाद्यातील प्रोटीन्स सारखे बहुमुल्य अन्नद्रव्य वाया जात असते.
◼️ रूमेनमधील जीवाणुद्वारा होणाऱ्या प्रथिनांच्या विघटनाचा दर कमी करण्याकरिता पशुखाद्यातील प्रथिनेयुक्त घटकांवर (ढेप) रासायनिक प्रक्रिया केल्याने विघटनाचा दर २५ ते ३० टक्क्यांवर येऊन, आवश्यक तेवढी प्रथिने जीवाणूंकरिता उपलब्ध राहून उर्वरित प्रथिने जनावराच्या पोटात (अॅबोमॅझम) पचनाला उपलब्ध होतात.
◼️ अशा प्रकारे प्रक्रियायुक्त ढेपेचा जनावरांच्या खाद्यात वापर केल्यास उच्च उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांकडून अपेक्षित उत्पादन घेणे शक्य होते.

बायपास फॅट
◼️ गाभण काळात आवश्यक पोषण न झाल्याने संकरित गाई व उच्च उत्पादक म्हशींमध्ये व्याल्यानंतर अचानक वजन कमी होण्याचा प्रकार दिसून येतो.
◼️ या जनावरांचे वजन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही जनावरे पुढील माज दाखवत नाहीत. परिणामी दोन वेतातील अंतर वाढते.
◼️ उच्च उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांना जास्त उर्जायुक्त आहार देण्याचे दृष्टीने जनावरांच्या खाद्यात तेलाचा वापर केल्यास रूमेनमधील जीवाणूंची संख्या कमी होऊन खाद्यातील तंतुमय पदार्थांचे विघटनावर परिणाम होतो.
◼️ याकरिता फॅटवर रासायनिक प्रक्रिया करून जीवाणूंच्या संख्येत घट न होऊ देता पोटात (अॅबोमॅझम) पचनाला उपलब्ध होऊ शकणारे फॅट म्हणजे बायपास फॅट.
◼️ उच्च उत्पादक जनावरांना विण्याअगोदर एक महिना व व्याल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात बायपास फॅट पशुखाद्यात दिल्यास दूध व दुधातील फॅट दोन्ही बाबीत वाढ होते तसेच तात्पुरत्या वंधत्वाच्या समस्या उद्भवत नाही.

अधिक वाचा: जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखाल? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

Web Title: How important are bypass proteins and fats in animal diets and why? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.