Join us

गोकुळची ६३वी सर्वसाधारण सभा झाली; सभेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:22 IST

Gokul Milk AGM 'गोकुळ'च्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करण्यास पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली.

'गोकुळ'च्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करण्यास पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी या दुरुस्तीस सभेत विरोध केला.

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर सभा झाली.

प्राथमिक दूध संस्थांकडून आलेल्या वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ३ तर गाय दुधाला २ रुपये दिले जात होते. आमच्या काळात यामध्ये अनुक्रमे ६ व ४ रुपये अशी वाढ केली होती.

वासाच्या दुधाचे प्रमाण एकूण संकलनाच्या तुलनेत खूप कमी असले तरी यामध्ये दूध संस्थांचे नुकसान होते. यासाठी या दूध दरात वाढ केली असून म्हैस दुधाला १२ तर गाय दुधास ८ रुपये दर देणार असल्याची घोषणा 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सभेत केली.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, एनडीडीबी, सिस्टीम बायो व 'गोकुळ'च्या वतीने राबवण्यात आलेल्या बायोगॅस योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून दूध उत्पादकांना ५.९७ कोटींचे अनुदान मिळाले आहे.

दूध उत्पादकांची मागणी पाहता 'मागेल त्याला बायोगॅस' देण्याचा मानस आहे. स्वतःचा नवीन दही प्रकल्प १ ऑक्टोबरपासून सुरू करत असून बटरचे उत्पादन वाढविले जाणार आहे.

भविष्यातील ओला चारा व वाळलेला चारामिश्रीत 'आयडीयल टीएमआर' उत्पादन घेणार आहे. गडहिंग्जल चिलिंग सेंटरप्रमाणे 'बिद्री' चिलिंग सेंटर एक्स रे सुविधा पशुपालकांना देणार आहे.

मुराबरोबर आता 'पंढरपुरी' म्हशीएनडीडीबीच्या कोल्हापुरातील गोठ्यावर मुरा जातीच्या म्हशीबरोबरच पंढरपुरी म्हशीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

अधिक वाचा: राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार; आता मजबूत रस्ते तयार होणार

टॅग्स :गोकुळशेतकरीगायदुग्धव्यवसायदूधकोल्हापूरअन्न