Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > गोकुळने दूध खरेदी दर वाढविला; संस्थांकडून नविद यांचा सत्कार

गोकुळने दूध खरेदी दर वाढविला; संस्थांकडून नविद यांचा सत्कार

Gokul increases milk purchase price; Navid felicitated by institutions | गोकुळने दूध खरेदी दर वाढविला; संस्थांकडून नविद यांचा सत्कार

गोकुळने दूध खरेदी दर वाढविला; संस्थांकडून नविद यांचा सत्कार

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 'गोकुळ' दूध संघाच्या या निर्णयाबद्दल कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, उत्पादक हाच गोकुळचा खरा पाया आहे. दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी वर्ग यांचा संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. संघाच्या विविध योजना, अनुदाने आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक दूध उत्पादकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी वर्गाने प्रभावीपणे पार पाडावी.

संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, सचिव विश्वास पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ, रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सुनील विभूते आदी उपस्थित होते.

हेही वाचा : जनावरांना का गरजेचा असतो पशुआहार आणि त्याचे फायदे; जाणून घ्या पशुआहाराविषयी सविस्तर माहिती

Web Title : गोकुल ने दूध खरीद दरें बढ़ाईं; संस्थानों द्वारा नविद सम्मानित

Web Summary : गोकुल दूध संघ ने भैंस और गाय के दूध की खरीद दरों में वृद्धि की। अध्यक्ष नविद मुश्रीफ को कर्मचारी संघ द्वारा सम्मानित किया गया। मुश्रीफ ने किसान कल्याण और संघ की प्रगति में कर्मचारियों की भूमिका पर जोर दिया, उनसे गोकुल की योजनाओं के बारे में किसानों तक जानकारी पहुंचाने का आग्रह किया।

Web Title : Gokul Raises Milk Purchase Prices; Navid Felicitated by Institutions

Web Summary : Gokul Milk Union increased purchase prices for buffalo and cow milk. President Navid Mushrif was felicitated by the employees' union. Mushrif emphasized farmer welfare and the role of employees in the union's progress, urging them to disseminate information about Gokul's schemes to farmers.