Join us

गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करणार अधिक गोड मिळणार दूध फरक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:38 IST

Gokul Milk गोकुळ' दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे.

कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे.

म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये २५ तर गाय दूध उत्पादकांना १ रुपये २५ पैसे फरक मिळणार आहे. 'गोकुळ'ने प्रतिदिनी दूध संकलनाचा १८ लाख ४२ हजार लिटरचा टप्पा ओलांडला आहे.

दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढन एका दिवसात रमजान ईदनिमित्त २२ लाख ३१ हजार लिटरची विक्रीचेही उच्चांक गाठला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादकास ५८ रुपये ५४ पैसे तर गाय दूध उत्पादकास ३८ रुपये ३७ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.

डिबेंचर्सपोटी २५ पैसे संस्थांच्या नावावर करणारगोकुळ'ने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २.५० व गाय दूधासाठी १.५० रुपये फरक जाहीर केला असला तरी त्यातील प्रतिलिटर २५ पैसे संबधित दूध संस्थांच्या खात्यावर डिबेंचर्सपोटी वर्ग केले जाणार आहेत.

असा मिळणार दूध फरकम्हैस : ५८ कोटी ६१ लाख ५८ हजारगाय : ३४ कोटी ७० लाख ९३ हजारदूध फरकावर ६ टक्के प्रमाणे व्याज : ३ कोटी २० लाख ३५ हजार शेअर्स भांडवलावर ११ टक्क्यांप्रमाणेडिबेंचर्स : ८ कोटी १६ लाख ८९ हजार संलग्न साडेपाच लाख दूध उत्पादकांना लाभ कोल्हापूर जिल्हा व सीमाभागातील गोकुळ'शी संलग्न ७९२७ दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध फरकाचा लाभ होणार आहे.

टॅग्स :गोकुळदुग्धव्यवसायशेतकरीगायदूधकोल्हापूर