Join us

दुभत्या जनावरांना 'हा' चारा दिल्यास दूध उत्पादनात व फॅटमध्ये होतेय वाढ; कशी कराल लागवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:41 IST

व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते.

व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते.

ओट चारा पिकाचे फायदे◼️ ओट हे गव्हासारखे दिसणारे परंतु गव्हापेक्षा थोडे उंच वाढणारे आणि भरपूर फुटवे असणारे एकदलवर्गीय चारा पीक आहे.◼️ ओट हे उत्पादनक्षम, पोषक असून त्याचा वापर हिरवा चारा व भुसा अशा प्रकाराने करता येतो.◼️ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असून खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते.◼️ त्यामुळे जनावरे या पिकाचा जवळजवळ सर्वच भाग आवडीने खातात.◼️ दुभत्या जनावरांना हा चारा दिल्यास दुधाच्या उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय दुधातील स्निग्धांश वाढण्यासही मदत होते.◼️ ओटच्या चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

लागवडीसाठी आवश्यक हवामान व जमीन◼️ थंड व दमट हवामान ओटच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.◼️ पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन ओटच्या वाढीसाठी उत्तम मानली जाते.पुर्वमशागत◼️ पेरणीपुर्वी एकदा नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.◼️ पुर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.

वाण, बीजप्रक्रिया व पेरणी◼️ पेरणीसाठी फुले हरिता (बहु कापणीसाठी), फुले सुरभी किंवा केंट (एक कापणीसाठी) या सुधारीत जातींचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.◼️ पेरणीपुर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर या जिवाणू सवंर्धकाची बीज प्रकिया करावी.◼️ साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळीत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी.

खत व्यवस्थापन ◼️ ओट चारा पिकासाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.◼️ यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा.◼️ तर उर्वरीत ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी व ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्यावे.

तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन◼️ तण नियंत्रणासाठी साधारणपणे २५ ते ३० दिवसात खुरपणी करावी.◼️ आवश्यकतेनुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापणी व उत्पादन◼️ पहिली कापणी ५० दिवसांत व दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी अथवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी.◼️ हिरव्या चाऱ्याकरिता पिकाची कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी.◼️ हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन दोन कापण्यांद्वारे मिळते.

अधिक वाचा: ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Oat Fodder Boosts Milk Production & Fat in Dairy Animals

Web Summary : Feeding oat fodder increases milk yield and fat content in dairy animals. It's a nutritious, palatable feed, rich in protein. Requires well-drained soil and proper fertilization for optimal growth and yield. Two cuttings yield 500-600 quintals/hectare.
टॅग्स :दुग्धव्यवसायदूधपीकपीक व्यवस्थापनशेतीगायरब्बीपेरणीखतेलागवड, मशागत