Join us
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती व पशुधनाकरीता अत्यावश्यक लसमात्रा तयार होतायत आता आपल्याच राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:16 IST

Institute of Veterinary Biological Products Pune पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असून लहान शेतकऱ्यांसाठी दूध, अंडी, मांस, जिवांमृत, शेणखते व शेतीकामासाठी ते अत्यावश्यक आहेत.

पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असून लहान शेतकऱ्यांसाठी दूध, अंडी, मांस, जिवांमृत, शेणखते व शेतीकामासाठी ते अत्यावश्यक आहेत.

विविध प्रकारच्या जिवाणू अथवा विषाणूपासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांमुळे दुधाळ पशुधनाचे उत्पादन घटते, कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा ठरतो.

पशुधानामध्ये नियमित लसीकरणाने रोगप्रादुर्भाव कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते व उत्पादन वाढण्यास मदत होते.

पशुधनाचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची नैतिक व मानवीय जबाबदारी असून महाराष्ट्रातील पशुधानाकरीता अत्यावश्यक लसमात्रा पुरवठा व निर्मिती क्षेत्रात पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था (पुणे) चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे◼️ सन १९४७ मध्ये Serum & Vaccine Institute म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे स्थापन झालेली आहे. तथापि, सन १९५९ साली संस्थेचे पुणे येथे स्थलांतर होऊन पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे (IVBP) असे नामकरण करण्यात आले.◼️ महाराष्ट्रांमध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पाळीव प्राणी व पक्षी यांच्यासाठी रोग प्रतिबंधात्मक लसमात्रा व रोग निदानाकरीता आवश्यक जैव पदार्थांचे चे उत्पादन करणारी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-७ ही एकमेव राज्यस्तरीय संस्था आहे. ◼️ महाराष्ट्र राज्यास पशुधनाकरीताच्या लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून राज्यातील पशुपालकांना दर्जेदार पशुवैद्यकीय जैविक उत्पादने उपलब्ध करून देणे.◼️ तसेच राज्यातील पशुधन रोग मुक्त ठेवुन पशुधन व कुक्कुट यापासून दुग्ध, मांस व अंडी यांच्या उत्पादनात वृद्धी करणे व याद्वारे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ही संस्था सदैव प्रयत्नशील आहे.◼️ संस्थेंतर्गत पाळीव पशुधन व कुक्कुट पक्षी यांना लागणाऱ्या जिवाणू व विषाणू लसमात्रा, अभिकारके-द्रावणे तयार केली जातात.◼️ सर्व लसमात्रांचे उत्पादन औषधी व प्रसाधने कायदा-१९४५ च्या शेड्यूल-एम मध्ये विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून करण्यात येतात.◼️ लस उत्पादन झाल्यानंतर त्या वितरण करण्यापूर्वी चाचणी व गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत त्यांच्या सर्व प्रकारच्या आधुनिक व काटेकोर पद्धतीने चाचण्या करून सुरक्षिततेच्या अत्युच्च मानकांची खात्री केल्यानंतरच पशुपालकांना विश्वासार्ह व परिणामकारक लसमात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.◼️ या सर्व लसमात्रा राज्यभरातील सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय संस्थाना विनामूल्य पुरविल्या जातात ज्या तद्नंतर पशुधनास लसीकरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. या शास्त्रशुद्ध आणि सुसूत्रताबद्ध कार्यपद्धतीमुळे या संस्थेची देशातील नामवंत लस निर्मिती संस्थामध्ये गणना केली जाते.

संस्थेंतर्गत कार्यरत विभाग१) जिवाणू लस उत्पादन विभागसंस्थेच्या जिवाणू लस उत्पादन विभागामार्फत पशुधनातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार या आजारांवरील लसमात्रांचे उत्पादन करण्यात येते. सध्या संस्थेत जिवाणू लस उत्पादनासाठी आधुनिक फरमेंटर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असून आदर्श उत्पादन पद्धतींच्या (cGMP) मानांकनानुसार लस उत्पादनाची प्रक्रिया अविरतपणे सुरू असून उत्पादित लस मात्रांचा क्षेत्रीय स्तरावर आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे. लस उत्पादनाकरीता प्रभावी, उच्च दर्जाचे व स्थिर जैविक बीज (Bacterial Strain)  वापरण्यात येत असून त्या बीजांचे प्रयोगशाळेमध्ये जैविक (Biological), जैव रासायनिक (Bio-chemical) व जनुकीय (Molecular) चाचण्या करून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या माहितीचे संकलन व विश्लेषण केले जाते. गायी-म्हशीमधील मोठ्या प्रमाणत आढळणाऱ्या स्तनदाह (Mastitis) या रोगाच्या प्राथमिक व क्षेत्रीय स्तरावरील तात्काळ निदानाकारीता अत्यंत उपयुक्त “CMT Reagent” तसेच, कोंबड्यांतील साल्मोनेल्ला रोगाच्या निदानासाठी वापरले जाणारे “Salmonella Coloured Antigen” यांचेही या विभागांतर्गत उत्पादन केले जाते.

२) कुक्कुट व विषाणू लस उत्पादन विभागराष्ट्रीय कृषी विकास (RKVY) योजनेअंतर्गत कुक्कुट व विषाणू लस उत्पादन विभागात अत्याधुनिक प्रकल्प कार्यरत असून या प्रकल्पामार्फत पशुधन व कुक्कुट यांच्यासाठी पीपीआर (PPR), मेंढ्यांची देवी (Sheep Pox), लम्पी चर्मरोग (Lumpy Skin Disease), शेळ्यांची देवी (Goat Pox), कोंबड्यांची देवी (Fowl Pox), मरेक्स रोग (Marek’s Disease), मानमोडी (RD/Lasota) या विषाणूजन्य लसमात्रांचे तंत्रशुद्ध पद्धतीने उत्पादन केले जाते. आदर्श उत्पादन पद्धतींच्या (cGMP) मानांकनानुसार फलित अंड्यांची निवड करण्यापासून ते अंतिम लसमात्रा उत्पादनापर्यंत अर्धस्वयंचलित संयंत्रांचा वापर करण्यात येत आहे. या आधुनिक प्रकल्पामुळे कुक्कुट व विषाणू लसमात्रांच्या उत्पादन क्षमतेत पूर्वीच्या तुलनेत सुमारे पाच पटीने वाढ झाली असून पशुधन आरोग्य व शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे.

३) चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण विभागसंस्थेंतर्गत लसमात्रा उत्पादनासाठी खरेदी करण्यात आलेल्या मिडिया, रसायने व इतर साहित्यांची तसेच लस उत्पादन झाल्यानंतर वितरण पूर्व लसमात्रांची व अभिकारके यांची सुरक्षितता, प्रभाविकता आणि दर्जा सुनिश्चित करण्याचे महत्वाचे काम या विभागांतर्गत प्रयोगशाळेमध्ये आधुनिक व काटेकोर पद्धतीने चाचणी करून सिद्ध करण्यात येते.

४) लघुप्राणी विभागलघुप्राणी विभागामध्ये लस उत्पादन, चाचणी तसेच गुणनियंत्रण प्रक्रियेसाठी आवश्यक लहान प्रयोगशालेय प्राणी (पांढरे उंदीर, ससे व गिनी पिग) तसेच मोठे प्रयोगशालेय प्राणी (शेळ्या, मेंढ्या इ.), कुक्कुट पक्षी व एस.पी.एफ. अंडी यांचे उत्पादन व संगोपन केले जाते. याशिवाय, विभागाकडे सीपीसीएसईए (CCSEA) अंतर्गत लहान प्रयोगशालेय प्राण्यांच्या विक्रीचा वैध परवाना उपलब्ध असून, त्यानुसार अतिरिक्त प्रयोगशालेय प्राणी सीपीसीएसईए नोंदणीकृत संस्थांना विक्री करण्यात येतात.

लसीकरण हा खरे तर खर्च नसून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर गुंतवणूक आहे. जनावरे दगावल्यास शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो परंतु वेळेवर लस दिल्यास हा धोका टाळता येतो. सामूहिक लसीकरण मोहिमांमुळे संपूर्ण गावातील पशुधन सुरक्षित राहते आणि रोगांचा प्रसार थांबतो.

संसर्गजन्य आजारांचा प्रसार थांबवण्यासाठी केवळ वैयक्तिक उपचार पुरेसे नसून समाजस्तरावर संरक्षण निर्माण होणे अत्यंत आवश्यक असते. या सामूहिक संरक्षणालाच “हर्ड इम्युनिटी किंवा कळप प्रतिकारशक्ती” असे म्हणतात.

जेव्हा एखाद्या समुदायातील मोठ्या प्रमाणात लोक किंवा जनावरे एखाद्या रोगाविरुद्ध लसीकरणामुळे किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीमुळे सुरक्षित होतात, तेव्हा त्या रोगाचा प्रसार आपोआप कमी होतो.

 पशुवैद्यकीय क्षेत्रात हर्ड इम्युनिटीला विशेष महत्त्व आहे. जनावरांचे नियमित व वेळेवर लसीकरण केल्यास कळपात रोगाचा प्रसार रोखता येतो, पशुधनाचे आरोग्य सुधारते, उत्पादनक्षमता वाढते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते.

तसेच काही प्राणिजन्य रोग (Zoonotic diseases) मानवांपर्यंत पसरण्याचा धोका कमी होतो. पशुपालकांनी लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण करून घ्यावे.

“निरोगी जनावरे म्हणजे समृद्ध पशुपालक, आणि समृद्ध पशुपालक म्हणजे सक्षम ग्रामीण भारत!” त्यामुळे जनावरांतील लसीकरणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

- डॉ. याहयाखान पठाणसहआयुक्त पशुसंवर्धनमोबा. ९४२३३२४६०९- डॉ. सुनिता चौगुलेसहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन- डॉ. ऋषीकेश काळेपशुधन विकास अधिकारी

अधिक वाचा: कुक्कुटपालन, डेअरी व शेळीपालन व्यवसायाच्या वीज बिलात होणार आता बचत; कसा घ्याल फायदा?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to produce own veterinary bio-products and livestock vaccines.

Web Summary : Maharashtra's IVBP Pune, a state-level institute, produces vital livestock vaccines. Aiming for self-sufficiency, it provides quality products, disease prevention and boosts livestock production, benefiting farmers statewide by offering free vaccines.
टॅग्स :दुग्धव्यवसायगायपोल्ट्रीशेळीपालनराज्य सरकारसरकारपुणेशेतकरीमहाराष्ट्र