दूध पावडर व बटरचे देशांतर्गत बाजारपेठेत दर थोडे वधारल्याने राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली आहे. हे दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर देणार आहेत.
मात्र 'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या दूध संघांचा दर तीस रुपये असल्याने त्यांनी खरेदी दर जैसे थे ठेवले आहेत.
गाय दूध अतिरिक्त झाल्याने राज्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. मध्यंतरी सर्वच दूध संघांनी प्रतिलिटर तीन रुपयांनी दर कमी केले होते.
'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू', दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी तीस रुपये, तर इतर दूध संघांनी २८ ते २९ रुपये दर केला होता. शासनानेही १ डिसेंबरपासून गाय दूध अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.
दूध संघांनी दरात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यात, गेल्या महिन्याभरापासून देशातंर्गत बाजारपेठेत दूध पावडर व बटरच्या दरात थोडीसी वाढ झाल्याने संघांनी खरेदी दरात वाढ करायचा निर्णय घेतला आहे.
प्रतिलिटर तीस रुपये दराने दूध खरेदी केले जाणार आहे. मात्र, 'गोकुळ', 'वारणा' व 'राजारामबापू' दूध संघ अगोदरच तीस रुपये दर देत असल्याने त्यांनी दरवाढ केलेली नाही.
देशांतंर्गत बाजारपेठेत दर प्रतिकिलो
पावडर | बटर | |
महिन्यापूर्वीचा दर | २१५ | ३८५ |
सध्याचा दर | २२५ | ३९५ |
फेब्रुवारीनंतर खरेदी दरात वाढ शक्य
• फेब्रुवारी महिन्यात दुधाबरोबरच पावडर व बटरची मागणी वाढते. परिणामी दूध खरेदी दरात वाढ होते.
• गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादकांची घालमेल सुरू आहे. येत्या महिन्याभरात दरात वाढ अपेक्षित आहे.