Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > Kolapani Yantra : कमी खर्चात, उत्तम काम, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवले कोळपणी यंत्र

Kolapani Yantra : कमी खर्चात, उत्तम काम, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवले कोळपणी यंत्र

Latest News Kolpani yantra Engineering students make Ploughing machine at low cost | Kolapani Yantra : कमी खर्चात, उत्तम काम, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवले कोळपणी यंत्र

Kolapani Yantra : कमी खर्चात, उत्तम काम, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवले कोळपणी यंत्र

Kolapani Yantra : शेतकरी दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कोळपणी करू शकतो तेही विना कुठल्या खर्चाशिवाय.

Kolapani Yantra : शेतकरी दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कोळपणी करू शकतो तेही विना कुठल्या खर्चाशिवाय.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे मजुरांवर तसेच ट्रॅक्टर व शेती अवजारांवर होणारा खर्च. यावर मात करण्याकरता धानोरे येथील मातोश्री पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सोलरवर चालणारे कल्टिवेटर (Solar Cultivator) अन् कोळपणी यंत्र (Kolapani Yantra) बनवले आहे. 

यंत्र बनवण्याचा उद्देश इंधनाचा खर्च टाळण्यासाठी तसेच शेतमजुरांवर अवलंबून न राहता सौरऊर्जेच्या (solar Energy) मदतीने शेतीसाठी आवश्यक असलेली कोळपणी आणि कल्टिवेटर करणे तसेच यांत्रिक शेतीचा आणि मजुरीचा वाढता खर्च कमी करणे हा असल्याचे सांगण्यात आले. या यंत्रासाठी विद्यार्थ्यांना फक्त आठ हजार रुपये एवढा खर्च आला आहे. या सोलर यंत्राचा (Solar System) वापर करून शेतकरी दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कोळपणी करू शकतो तेही विना कुठल्या खर्चाशिवाय.

या सोलर कल्टिवेटरमध्ये सौर पॅनल्सचा वापर करून इलेक्ट्रिक मोटरद्वारे कोळपणी आणि कल्टिवेटरचे काम होते. त्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होते. हे यंत्र मका, बाजरी, कपाशी, टॉमेटो या पिकांसाठी शेतकरी वापरू शकतो.या महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिकणारे चंद्रकांत टोपले, उमेश महाले, मनोज गावित, खुशाली गावित यांनीहा प्रयोग यशस्वी केला आहे.  


सुरगाणा येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर येवला येथील मातोश्री पॉलिटेक्निक येथे शिष्यवृत्ती योजनेतून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे मोफत शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षात शिक्षकांच्या माध्यमातून या प्रोजेक्टवर काम केले. जो यशस्वी झाला असुन लवकरच उत्पादन करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. 
- चंद्रकांत टोपले, विद्यार्थी

शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल
स्वतःचा व्यवसाय उभा करावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग दिले जातात. त्यावर पाच ते सहा महिने काम करावे लागते. याबाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन शिक्षकांकडून वारंवार मिळत असते. आता या विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार, टिकाऊ, कमी खर्चिक असे कोळपणी यंत्र तयार केले आहे. शेत कामासाठी लागणारे निगडीत तयार केलेले उपकरण नक्कीच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. 
- डॉ. गीतेश गुजराथी, प्राचार्य, मातोश्री पॉलिटेक्निक, येवला

Web Title: Latest News Kolpani yantra Engineering students make Ploughing machine at low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.