Sugarcane Jaggery : सध्या गाळप हंगाम सुरु आहे. या काळात ऊस तोड आणि गाळप सुरु असल्याने एकीकडे साखरेचे उत्पादन दुसरीकडे गूळ तयार करण्याची प्रक्रिया जोमात सुरु आहे. उत्तम प्रतीचा गूळ /काकवी तयार करण्यासाठी ऊसाच्या रसामधील घटकांचे प्रमाण योग्य असायला हवे. गूळ तयार करण्याची प्रक्रिया नेमकी कशी केली जाते, ते पाहुयात...
साधारणपणे गूळ तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे ऊसाचा रस काढून, तो उकळून घट्ट करणे आणि नंतर थंड करून त्याचे ढेपाळ (घट्ट) स्वरूप देणे. यात रस काढणे, गाळणे (अशुद्धी काढणे), उकळणे आणि घट्ट झाल्यावर साच्यात ओतून थंड करणे या प्रमुख पायऱ्या आहेत. थोडं तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊयात...
गूळ तयार करण्याची प्रक्रिया
- काहिलीतील पाकाचे तापमान १०३.५० सें. ते १०५० सें. असताना काकवी तयार होते.
- या स्थितीनंतर रस ऊतू जाऊन पाक व्यवस्थित उकळू लागतो.
- त्यावेळी २०० मिली एरंडेल किंवा शेंगदाणा तेल काहिलीत घालावे. म्हणजे पाकाचे तापमान वाढण्यास मदत होते.
- पाकाचे तापमान ११८० सें. झाले असता काहील चुलाणावरून खाली उतरवावी व वाफ्यात गूळ ओतावा.
- इलेक्टॉनिक्स थर्मामीटर नसेल तर गोळी चाचणी घ्यावी.
- यासाठी पाक लाकडी फावड्यावर घेऊन तो थंड पाण्यात बुडवावा आणि त्याची गोळी तयार करावी.
- ती काहिलीच्या मोकळ्या पत्र्यावर जोरात फेकावी.
- गोळीचा पत्र्यावर टणक आवाज आल्यास गूळ तयार झाला असे समजावे.
- वाफ्यात पाक थंड होत असताना घोटण्याची क्रिया सावकाश करावी.
- पाकाचे तापमान ७६० सें. इतके खाली येण्यापूर्वी बाजारपेठेतील मागणीनुसार १, २, ५, १० किंवा ३० किलो वजनाच्या ढेपा तयार कराव्यात.
- गूळ व्यवस्थित झाकून कोरड्या गोदामात ठेवावेत.
- गूळ तयार करताना आरोग्यास हानिकारक रसायनांचा (हैयड्रास पावडर) वापर टाळावा.
- प्रा. एस. एस. प्रचंड, डॉ. डी. आर. निकम, डॉ. व्ही एन. गमे,
सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी हुलाजी सिताराम पाटील, कृषी महाविद्यालय, नाशिक
