बेहरामपाडयात झोपडपट्टीला लागलेली भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 05:58 PM2017-10-26T17:58:36+5:302017-10-26T18:35:16+5:30

मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.

महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.

बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे.

अरुंद गल्ल्या आणि जमलेली गर्दी यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना अनेक अडथळयांचा सामना करावा लागत आहे.

बेहरामपाडा झोपडपट्टीचा परिसर असून इथे झोपडपट्टया दाटीवाटीने वसलेल्या आहेत. त्यामुळे ही आग वेगाने पसरण्याची भिती आहे.

टॅग्स :आगfire