lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

Success Story: त्यांनी देश-विदेशातील अनेक कंपन्यांसोबत काम केलं आहे. पाहा कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:54 PM2024-05-09T15:54:20+5:302024-05-09T15:55:27+5:30

Success Story: त्यांनी देश-विदेशातील अनेक कंपन्यांसोबत काम केलं आहे. पाहा कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास.

Classmate of Google CEO Sundar Pichai lone woman in that batch of IIT kharagpur Now became the boss of companies Success Story of sharmistha dubey | Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

Success Story: शर्मिष्ठा दुबे या जमशेदपूरच्या रहिवासी आहेत. लोयोला स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) खरगपूर येथून बीटेक केलं. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे त्यांचे वर्गमित्र होते. त्या बॅचमधल्या त्या एकमेव महिला होत्या. आयआयटी खरगपूरच्या दीक्षांत समारंभाच्या त्या दिवसांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात शर्मिष्ठा या पिचाई यांच्यासोबत दिसत आहेत. अनन्या लोहानी नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केला आहे. त्यांचे वडील खरगपूरआयआयटीमध्ये सुंदर पिचाई यांच्याच बॅचमध्ये होते.
 

अशी झाली करिअरची सुरुवात
 

शर्मिष्ठा दुबे अनेकांना प्रेरणा देतात. मेहनत आणि निष्ठेनं प्रत्येक स्वप्न कसं साकार करता येतं याचं त्या उदाहरण आहे. दुबे यांनी १९९८ मध्ये टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये इंजिनीअर म्हणून आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्या सप्लाय चेन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कंपनी आय टू टेक्नॉलॉजीजमध्ये रुजू झाल्या.
 

२०२० मध्ये टिंडरचा कार्यभार स्वीकारला
 

शर्मिष्ठा दुबे २००६ मध्ये Match.com मध्ये रुजू झाल्या. मॅच ग्रुप अमेरिकेच्या अध्यक्ष, प्रिन्स्टन रिव्ह्यूच्या चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आणि ईव्हीपी अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. दुबे यांनी २०१३ ते २०१४ या काळात Tutor.com च्या ईव्हीपी म्हणूनही काम पाहिलं. २०१७ मध्ये शर्मिष्ठा यांची टिंडरच्या सीओओपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२० मध्ये त्या कंपनीच्या सीईओ बनल्या. कोरोना महासाथीच्या काळात त्यांनी या समूहाचे नेतृत्व केलं.
 

मॅच ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्ती
 

शर्मिष्ठा दुबे यांची १ जानेवारी २०१८ रोजी मॅच ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ मध्ये त्या संचालक मंडळात सामील झाल्या. त्यानंतर १ मार्च २०२० रोजी शर्मिष्ठा दुबे यांची या ग्रुपच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देणाऱ्या मॅन्डी गिन्सबर्ग यांच्या जागी त्यांना नियुक्त करण्यात आलं. 
 

१९९३ चे आयआयटीचे बॅचमेट्स
 

मे २०२२ मध्ये शर्मिष्ठा दुबे यांनी मॅच ग्रुपच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. बर्नार्ड किम यांनी त्यांची जागा घेतली. दुबे मॅच ग्रुपमध्ये संचालक म्हणून काम करत राहिल्या. मॅच ग्रुप ही टिंडर आणि ओकेक्यूपिड सारख्या विविध डेटिंग अॅप्सची मूळ कंपनी आहे. पिचाई आणि दुबे हे दोघंही आयआयटी खरगपूरमधील १९९३ च्या मेटलर्जीच्या B.Tech बॅचचे होते. मात्र, आयआयटीतील त्यांची एकमेव महिला वर्गमित्र शर्मिष्ठा दुबे यांची कहाणी काही कमी प्रेरणादायी नाही. त्यांना ऑनलाइन डेटिंग गेमला रिइव्हेंट करण्यासाठीही ओळखलं जातं.

Web Title: Classmate of Google CEO Sundar Pichai lone woman in that batch of IIT kharagpur Now became the boss of companies Success Story of sharmistha dubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.