कालिदास कोळंबकरांचा भाजपा प्रवेश; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:34 IST2019-07-31T14:33:05+5:302019-07-31T14:34:36+5:30
मुंबई - काँग्रेसचे नायगाव विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
मुंबई - काँग्रेसचे नायगाव विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कोळंबकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर येथे लाडू वाटप करुन आनंद व्यक्त केला. पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्या कालिदास कोळंबकरांना नायगावची जनता धडा शिकवेल असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला.