Next

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिलिंगचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 11:47 AM2019-07-31T11:47:51+5:302019-07-31T11:48:17+5:30

मुंबई - मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालं ...

मुंबई - मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालं नाही. शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इमारत कोसळणे, दरड कोसळणे अशा घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मंगळवारी असाच जोरदार पाऊस शहरात सुरु होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथे सिलिंगमधून पाणी गळू लागले. विमानतळाच्या गेटनंबर 3 जवळ असणाऱ्या सिलिंगचा 3 ते 4 फूट तुकडा अचानक खाली कोसळला. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांकडून याठिकाणी बॅरिकेट्स लावून खबरदारी घेण्यात आली.