Join us

'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:15 IST

अतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा ही मालिका एका वेगळ्या रुपात नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली.

अतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा ही मालिका एका वेगळ्या रुपात नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार आहे.

या मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. पण या दोघां व्यतिरिक्त मालिकेच्या प्रोमोज मधून मोहनच्या बायकोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण? हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे.

सरिता मेंहदळे ही अभिनेत्री 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत मधुवंतीची भूमिका साकारत आहे. टेलिव्हिजन आणि नाटक या माध्यमांमध्ये सरिताने काम केलं आहे. या आधी ती छोट्या पडद्यावर दोन मालिकांमध्ये झळकली होती.

तसंच, अमोल कोल्हे यांच्यासोबत 'अर्धसत्य' या नाटकात तिनं काम केलं होतं. भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. मोहनच्या रूपात तिला तिचं प्रेम सापडतं आणि ते प्रेम मिळवण्यासाठी ती काय काय करणार ही प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल. 

टॅग्स :झी मराठीसरिता मेंहदळे