Join us
Daily Top 2Weekly Top 5

World Obesity Day 2026: जेवणाचं ताट नाही ऑफिसची खुर्ची, हातातल्या मोबाईलमुळे वाढतंय वजन-सुटतंय पोट! संशोधनाचा दावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 17:00 IST

Obesity causes in youth 2026: Impact of mobile phones on obesity: Digital lifestyle and obesity research: आपण काय खातो यापेक्षा आपण 'कसे बसतो' आणि 'किती हालचाल करतो', यावर आता आरोग्याचे गणित अवलंबून आहे.

आजच्या धावपळीच्या युगात लठ्ठपणा ही केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या नसून ती एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. अनेकदा आपण वाढत्या वजनासाठी आपल्या जेवणाच्या ताटाला किंवा आहाराला दोष देतो.(Obesity causes in youth 2026) तेलकट खाणे, जंक फूड किंवा गोड पदार्थ यामुळेच पोट सुटते, असा एक सर्वसामान्य समज आहे. पण अलीकडे संशोधनातून (Research) समोर आलेले वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. (How to reduce belly fat for office workers)तरुणांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणासाठी केवळ आहार जबाबदार नसून, त्यांच्या आयुष्यातील दोन अविभाज्य गोष्टी ते म्हणजे'ऑफिसची खुर्ची' आणि 'मोबाईल फोन'. दिवसाचे ८ ते १० तास खुर्चीला खिळून राहणे आणि उरलेला मोकळा वेळ मोबाईलच्या स्क्रीनसमोर मान वाकवून घालवणे, यामुळे शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) पूर्णपणे मंदावत आहे.(Mindless eating while using phone) आपण काय खातो यापेक्षा आपण 'कसे बसतो' आणि 'किती हालचाल करतो', यावर आता आरोग्याचे गणित अवलंबून आहे.

Women's Day 2026 : स्पेशल डेट प्लान करताय? जुने टिपिकल गाऊन विसरा, घ्या १० सुंदर मॅक्सी ड्रेस- दिसा स्टायलिश

लठ्ठपणा वाढण्याचे कारण

सध्या अनेकजण कामामध्ये इतके व्यस्त असतात की सतत लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर त्यांना बसाव लागतं. सकाळी ऑफिसच्या खुर्चीवर बसल्यानंतर थेट संध्याकाळपर्यंत त्याच खुर्चीवर बसून राहतात. सतत एकाच जागी बसल्याने कॅलरीज कमी बर्न होतात. शरीरातील चयापचय मंदावते, पोट आणि कंबरेभोवतीची चरबी दुप्पट वेगाने वाढते. अनेक संशोधनातून असं दिसून आले की सलग ८ ते ९ तास एकाच जागी बसल्याने हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. वजन वाढण्याची समस्या ही फक्त खाण्यावर अवलंबून नसते तर शरीराची कमी हालचाल होणे यावर देखील असते. यासाठी आपण दर ४५ ते ६० मिनिटांनी ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. थोडे चाला, शरीराची स्ट्रेचिंग करा. उभे राहण्याचा प्रयत्न करा. 

ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात तेल आणि मीठ जास्त असते. त्यात कॅलरीज जास्त आणि पोषण कमी असते. आठवड्यातून ३ ते ४ वेळा बाहेर जेवल्यास वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. आपल्या घरांमध्ये, ऑफिसमध्ये किंवा प्रवास करताना लिफ्टचा वापर करण्याऐवजी चालत जा. यामुळे कॅलरीज बर्न होतात. हृदय आणि फुफ्फुसांना बळकटी मिळते. पायांचे स्नायू सक्रिय होतात. 

वाढत्या स्क्रीन टाइममुळे शारीरिक हालचाल कमी होते. झोपेची गुणवत्ता देखील खराब होते. रात्री उशिरापर्यंत खाण्याच्या सवयींमुळे देखील वजन वाढते. झोपेच्या किमान १ तासाआधी स्क्रीन बंद करा. रोज १ ते २ तास स्क्रीनशिवाय वेळ घालवा. मानसिक ताण कमी करा. नियमितपणे योगा किंवा व्यायाम केल्यास वजन वाढणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Obesity: Office chairs, phones, not food, cause weight gain, says research.

Web Summary : Research reveals sedentary office work and phone use, not just diet, contribute significantly to weight gain and metabolic slowdown. Lack of movement, excessive screen time, and late-night eating habits are key factors.
टॅग्स :वेट लॉस टिप्स