Join us

'या' कारणांमुळे महिलांनी उपवास करणं गरजेचं! व्यायाम केल्याने फिट राहाल, पण वजन घटविण्यासाठी.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 13:03 IST

Why Fasting Is Important For Women: महिला वर्ग आणि उपवास हे समीकरण आपल्याकडे फार पुर्वीपासून चालत आलं आहे (how to do fast for weightloss?). बघा त्यामागचं लॉजिकल कारण काय असू शकतं...(What are the benefits of fasting for women?)

ठळक मुद्देआपण हल्ली उपवास करण्याची पद्धतच पुर्णपणे बदलून टाकली आहे. त्यामुळे मग उपवास केल्याने शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होते.

आपल्याकडे असं दिसून येतं की कोणतेही उपवास असले की ते करण्यासाठी सगळ्यात पुढे असते घरातली स्त्री. काही जणी गुरुवार, मंगळवार, शुक्रवार असे वाराचे उपवास दर आठवड्याला करतात. त्याशिवाय एकदशी, चतुर्थी, गोकुळाष्टमी, नवरात्रीचे उपवास असं सगळंही असतंच.. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे उपवास करण्याचे प्रमाण जरा जास्त आहे आणि ते फार पुर्वीपासून आपल्याकडे चालत आलेले आहे. असं का असावं आणि महिलांच्याच मागे एवढे उपवास का असावे, याविषयीचं एक कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे (why fasting is important for women?). थोडा सखोल विचार केला तर महिलांच्या उपवास करण्यामागेही काहीतरी अभ्यास आहे आणि त्यामुळे शरीराला निश्चितच लाभ होऊ शकतो, हे लक्षात येतं. पण आपण हल्ली उपवास करण्याची पद्धतच पुर्णपणे बदलून टाकली आहे (how to do fast for weightloss?), त्यामुळे मग उपवास केल्याने शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होते.(What are the benefits of fasting for women?)

 

महिलांनी उपवास करणं का गरजेचं?

पुरुषांच्या तुलनेत महिलांना उपवास करण्याची गरज जास्त का आहे, याविषयीची माहिती डाॅक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की महिलांच्या शरीरात पुरुषांप्रमाणे टेस्टोस्टेरोन हार्मोन नसतो.

तळपाय कोरडे पडून खूपच भेगाळले? घरीच करा पेडिक्युअर- काळवंडलेले पाय दिसतील स्वच्छ, सुंदर

या हार्मोनमुळे पुरुषांनी थोडा व्यायाम केला तरी त्यांच्या शरीरातले फॅट कमी होऊन त्यांचे मसल्स स्ट्राँग होत जातात. पण असं मात्र महिलांच्या बाबतीत नसतं. त्यांच्यासाठी वेटलॉस पुरुषांएवढा सोपा नसतो. शिवाय पाळी सुरू होणे, बाळंतपणं, ब्रेस्ट फिडिंग, मेनोपॉज अशा कित्येक गोष्टींमुळे महिलांच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे मग त्यांच्या शरीरात फॅट जमा होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. 

 

आता हे अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी योग्य डाएट हा एक उत्तम मार्ग आहे असं डॉक्टर सांगतात. कारण व्यायाम केल्यामुळे निश्चितच तुमचा फिटनेस, शरीराची लवचिकता चांगली होते. पण तुमच्या वजनात खूप काही फरक पडू शकत नाही.

वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांनाही घामोळ्यांचा त्रास? ५ घरगुती उपाय- जळजळ थांबून मिळेल आराम

म्हणूनच जर फॅट लॉस करून वजन कमी करायचं असेल तर योग्य पद्धतीने उपवास करा. याचा अर्थ उपवास करून साबुदाणा, भगर, तेलकट पदार्थ खा असं मुळीच नाही. तर उपवासाच्या दिवशी फळं, सलाड, ताक, दूध असा आहार घ्या. शिजवलेले अन्न खाणं टाळा. महिन्यातून एकदा एखादा दिवस तरी असा उपवास करायला पाहिजे, असं डॉक्टर सुचवत आहेत. कारण असा उपवास केल्याने तुमचं शरीर साठवून ठेवलेले फॅट्स एनर्जीसाठी उपयोगात आणायला सुरुवात करतं.. त्यामुळे फॅट लॉस, वेटलॉस होतो.. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नमहिलानवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४