वाढत्या वजनामुळे अनेकजण व्यायाम, जिम आणि योगा करतात. इतकंच नाही तर पोट, मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काढा देखील पितो.(weight loss tips) पण काही केले तरी वजन कमी होत नाही. यामागे देखील काही महत्त्वाची कारणं असू शकतात. तणाव, झोपेची कमतरता, हार्मोन्समधील बदल (थायरॉईड, पीसीओडी) यामुळे देखील वजन वाढू शकते. (belly and thigh fat)व्यायाम केल्यानंतर आपल्या स्नायूंची वाढ होते आणि शरीरावरची चरबी हळूहळू कमी व्हायला लागते.(foods to avoid for weight loss) अनेकदा आपण चुकीचा आहार घेतल्यास देखील वजन वाढू शकते. आहारात जास्त प्रमाणात प्रोटीन किंवा फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्यास परिणाम होतो.(exercise and fat gain) अशावेळी वजनकाट्यावरची संख्या न पाहता शरीरातील चरबीचे प्रमाण आणि फिटनेस लेव्हल यावर लक्ष देणं अधिक उपयुक्त ठरेल.(weight gain reasons) जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर व्यायामासोबतच योग्य आहार देखील घेणे महत्त्वाचे आहे. कोणते पदार्थ आपण कमी प्रमाणात खायला हवे जाणून घेऊया.
मुलं फार चिडचिड करतात, नाकावर राग? आईबाबांच्या ५ चुकाही ठरतात त्रासदायक, पाहा काय करायचे..
1. ग्रॅनोलाला सुपरफूड मानले जाते. यामध्ये ओट्स, नट, बिया, मध , मनुका, क्रॅनबेरी आणि फ्लेवरिंग एजंट्स असतात. वजन कमी करण्यासाठी आणि पोट भरलेले राहावे यासाठी अनेकजण हा पदार्थ खातात. परंतु सगळ्यात जास्त हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये सगळ्यात जास्त साखर आणि अस्वास्थ्यकर तेल असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
2. आहारात रोज दही असायला हवं असं म्हटलं जाते. परंतु जर फ्लेवर दही खात असाल तर यामुळे वजन वाढू शकते. यात लपलेली साखर रक्तातील इन्सुलिन वाढवते. इतकेच नाही तर अनेकांना एनर्जी ड्रिंक म्हणून पॅक केलेला फळांचा ज्यूस अधिक आवडतो. यामध्ये असे अनेक पदार्थ असतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. यात फायबर नसते पण लठ्ठपणा वाढू शकतो.
3. भूक लागल्यानंतर आपण चिप्स किंवा तेलाचे पदार्थ खातो जे आरोग्यासाठी विष ठरते. यावर प्रक्रिया केलेली असते. त्यात रिफाइंड कार्ब्स आणि शरीरातील चरबी वाढवणारे घटक असतात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. प्रोटीन बार हे चॉकलेट बार सारखे असतात ज्यातून प्रोटीन कमी आणि वजन वाढणारे घटक जास्त असतात.
4. ब्राउन ब्रेड हा हेल्दी समजून खाल्ला जातो परंतु यात कमी प्रमाणात पोषण असते. जे आरोग्याला फायदा नाही तर नुकसान देते. पॅक केलेली स्मूदी पिणं टाळा. यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. ज्यामुळे आपले वजन वाढू शकते. सोया उत्पादने खाल्ल्याने आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो.