lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण म्हणतं केळी खाऊन वजन वाढतं? उलट वजन कमी करायचं तर नाश्त्याला...

कोण म्हणतं केळी खाऊन वजन वाढतं? उलट वजन कमी करायचं तर नाश्त्याला...

वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी केळ हा उत्तम आहार आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाºयांनी केळ अवश्य खायला हवं. केळातील फायबर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच रोज एक केळ नाश्त्याला खायलाच हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 02:10 PM2021-09-26T14:10:11+5:302021-09-26T16:27:00+5:30

वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी केळ हा उत्तम आहार आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाºयांनी केळ अवश्य खायला हवं. केळातील फायबर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच रोज एक केळ नाश्त्याला खायलाच हवं.

Who says eating bananas makes you gain weight? If you want to lose weight, then banana is must in breakfast ... | कोण म्हणतं केळी खाऊन वजन वाढतं? उलट वजन कमी करायचं तर नाश्त्याला...

कोण म्हणतं केळी खाऊन वजन वाढतं? उलट वजन कमी करायचं तर नाश्त्याला...

Highlightsकेळ खाल्ल्याने भरपूर वेळ पोट भरलेलं राहातं.केळात असलेलं पोटॅशिअम शरीरात ऊर्जा निर्मांण करतं आणि वजन वाढू देत नाही.वजन कमी करण्यासाठी केळ खात असाल तर ते स्मूदीच्या स्वरुपात घेतलं तर जास्त परिणामकारक ठरतं

 वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित करण्यासाठी डाएटच्या बाबतीत अनेक प्रयोग केले जातात. लो फॅट डाएट घेऊनही वजनावर काहीच परिणाम होत नाही. काय खावं काय टाळावं हा मोठा प्रश्न असतो. हा प्रश्न सोप्या पध्दतीनं सहज सोडवता येतो. आहारात केळ असलं की वजन कमी करायला खूप डाएटचे प्रयोग करावे लागत नाही. केळ खाल्ल्यानं वजन वाढतं म्हणून केळ आवडत असूनही केळ खाणं सोडून दिलं जातं आणि तिथेच मुख्य चूक होते. केळानं वजन वाढतं हा गैरसमज आहे. उलट वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी केळ हा उत्तम आहार आहे. एका केळात १०५ उष्मांक, ३ ग्रॅम फायबर आणि २७ ग्रॅम कर्बोदकं असतात. तसेच केळात प्रथिनंही असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाºयांनी केळ अवश्य खायला हवं. केळात असलेल्या फायबरमूळे शरीराद्वारे कर्बोदकं शोषले जात नाही. केळाच्या सेवनानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. केळामुळे शरीरातील चरबी ऊर्जेसाठी म्हणून खर्च होते. केळामुळे कर्बोदकाचं शोषण हे फॅटसच्या स्वरुपात होतं आणि केळातील फायबरमुळे हे फॅटस ऊर्जेत रुपांतरित होतात. आणि म्हणूनच केळाद्वारे वजन सहज कमी करता येतं.
वजन कमी करण्यासाठी केळ कसं खावं?

1. सकाळी नाश्त्याला केळ

 केळ सकाळी नाश्त्याच्या वेळेस खाल्लं तर ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण सकाळचा नाश्ता आपल्याला निरोगी आणि दिवसभर फिट आणि उत्साही ठेवण्यासाठी उपयोगाचा असतो. सकाळच्या नाश्त्यामुळे पोट भरणं, कामासाठी ऊर्जा मिळणं आणि यातून वजन न वाढणं हे मूख्य उद्देश असतात. म्हणूनच भरपूर फायबर आणि प्रथिनं असलेलं केळ खाणं उत्तम ठरतं. केळात असलेलं पोटॅशिअम शरीरात ऊर्जा निर्मांण करतं. तसेच केळ खाल्ल्याने भरपूर वेळ पोट भरलेलं राहातं. सकाळी नास्थ्याला पोहे, उपमा, दलिया, ओटस खात असाल तर सोबत एखादं केळ नक्की खावं.

2. केळाची स्मूदी


 वजन कमी करण्यासाठी केळ खात असाल तर ते स्मूदीच्या स्वरुपात घेतलं तर जास्त परिणामकारक ठरतं. केळाची स्मूदी तयार करणं सोपं आहे,. स्मूदी तयार कराण्यासाठी एक केळ घ्यावं. सोबत १०--१५ पालकाची पानं घ्यावीत. एका वाटीत अननसाचे बारीक तूकडे घ्यावेत. १ चमचा चिया सीडस, थोडंसं आलं घ्यावं. नंतर कपभर दुधात बदाम घालावेत आणि हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. अशा प्रकारे तयार होणारी स्मूदी पचन, पोषण आणि वजन या तिन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची असते.

Web Title: Who says eating bananas makes you gain weight? If you want to lose weight, then banana is must in breakfast ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.