महाराष्ट्रीयन ताट म्हटलं की वरण- भात किंवा आमटी- भात हा आलाच. जेवणात भात नसेल तर अनेकांना जेवण अपूर्णच वाटतं. (white rice vs brown rice) पण मागच्या काही वर्षांत फिटनेसकडे अनेकांचा कल वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये, लोक दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवट भात किंवा भातापासून बनवलेले पदार्थ खाणे पसंत करतात.पांढरा तांदूळ किंवा तपकिरी तांदूळ खातात, परंतु काहींना त्यांच्या आरोग्यासाठी कोणता भात चांगला आहे हे माहित नाही. (best rice for weight loss)वजन कमी करणाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो पांढरा तांदूळ (White Rice) खावा की ब्राऊन राईस (Brown Rice)? अनेकजण वजन वाढण्याच्या भीतीने भात खाणं सोडतात, पण खरंच त्याची गरज आहे का? आपल्या आरोग्यासाठी आणि 'बेली फॅट' कमी करण्यासाठी कोणता तांदूळ चांगला आहे, पाहूया. (brown rice benefits)
पांढरा तांदूळ किंवा ब्राऊन राईसमध्ये खूप फरक असतो. ब्राऊन राईस पॉलिश केलेला नसतो. यामुळे तो अधिक पोषक तत्व टिकवून ठेवू शकतो. पांढरा तांदूळ पॉलिश केला जातो, ज्यामुळे त्याचे पौष्टिक तत्व कमी होते. ब्राऊन राईसमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्व भरपूर असतात. पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केल्यावर त्यातील फायबर आणि पोषक तत्वे कमी होतात.
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर ब्राऊन राईस हा फायदेशीर आहे. यात भरपूर फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे तो पचायला वेळ घेतो. त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही, जे वजन नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक ठरते. ब्राऊन राईसमध्ये असणारे पोषक घटक शरीराची चयापचय शक्ती वाढवण्यास मदत करतात.
पांढरा भात खाण्याचे फायदे
पांढरा तांदूळ हा लवकर पचतो, त्याची चव देखील चांगली असते. ज्यांची पचनशक्ती कमकुवत असते किंवा ज्यांना शरीरातील ऊर्जा वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी पांढरा तांदूळ चांगला असतो. पण या तांदळामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
ब्राऊन राईस कोणी खाऊ नये?
ब्राऊन राईस हा प्रत्येकासाठी चांगला नाही. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यांना गॅस, पोट फुगणे किंवा वारंवार जुलाब होण्याचा त्रास आहे. त्यांच्यासाठी हा राईस जड ठरतो. किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी आहारात पोटॅशियम आणि फॉस्फरसचे पदार्थ कमी खायला हवे. पांढर्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस जास्त असते. ज्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो.
Web Summary : Brown rice, rich in fiber, aids weight loss and controls blood sugar. White rice digests faster, good for energy but raises sugar levels. Consider individual health needs.
Web Summary : ब्राउन राइस, फाइबर से भरपूर, वजन घटाने में सहायक और ब्लड शुगर को नियंत्रित करता है। सफेद चावल जल्दी पचता है, ऊर्जा के लिए अच्छा है लेकिन शुगर का स्तर बढ़ाता है। व्यक्तिगत स्वास्थ्य आवश्यकताओं पर विचार करें।