वाढतं वजन कमी कसं करायचं ही समस्या सध्या अनेकांना छळते आहे. वजन वाढण्यामागची सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजे आपल्या आहारात झालेला बदल आणि व्यायामाचा अभाव. पुर्वी लोक व्यायाम नियमितपणे करायचे नाहीत. पण चालणे किंवा इतर अंग मेहनतीची कामं त्यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात व्हायची. शिवाय आहारसुद्धा अगदी प्रमाणशीर असायचा आणि घरचे अन्नच प्रामुख्याने खाल्ले जायचे. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत व्हायची. पण आता मात्र या दोन्ही गोष्टीच नेमक्या खूप बदलल्या आहेत. म्हणूनच लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच लठ्ठपणाचा त्रास होतो आहे. तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा एक सोपा उपाय करून पाहा (how to use dalchini powder for weight loss?). यासाठी तुमच्या किचनमधली दालचिनीची पावडर तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते.(use of dalchini powder for weight loss)
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग
एनसीबीआय यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार दालचिनीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि मेटाबॉलिझम अधिक उत्तम होण्यासाठी उपयुक्त ठरणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चरबी कमी होण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
लवंग आणि तूप एकत्र करून खाण्याचे ५ जादुई फायदे, बघा एवढीशी लवंग काय कमाल करते...
यासोबतच दालचिनीचे नियमितपणे सेवन केल्यास पचनक्रियाही अधिक चांगली होते. अन्नाचे पचन चांगले झाले की आपोआपच अंगावर चरबी साचण्याचे प्रमाण कमी होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही दालचिनीचा उपयोग होतो.
भूक नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो. यामुळे शुगर क्रेव्हिंगही होत नाही. या दोन्ही गोष्टी नियंत्रित राहिल्या की आपोआपच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
दालचिनी आहारात कशा पद्धतीने घ्यावी?
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार दालचिनी खाऊ शकता..
१. ग्लासभर पाणी घ्या. त्यात १ टीस्पून दालचिनीची पावडर घाला आणि ते पाणी ६ ते ७ मिनिटे उकळवून घ्या. हे उकळलेलं पाणी उपाशीपोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.
लग्नाचे मुहूर्त, हळदीच्या कार्यक्रमात काढण्यासाठी ५ सुंदर रांगाेळ्या, कार्यक्रम होईल आणखी देखणा
२. दालचिनीची पावडर घालून केलेला ब्लॅक टी किंवा ग्रीन टी सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
३. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, सूपमध्ये घालूनही तुम्ही दालचिनी खाऊ शकता.
पण वजन घटविण्याच्या नादात दालचिनी अतिप्रमाणातही खाऊ नका.