Join us  

ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 12:49 PM

How To Make Weight loss Coffee Recipe : वजन कमी करायचं म्हणून अनेकजण स्वत:वर प्रयोग करतात, ब्लॅक कॉफी पितात पण त्यानं वजन खरंच कमी होतं का?

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण रोज हजारो उपाय करुन पाहण्याच्या प्रयत्नात असतो. वजन कमी करण्यासाठी कुणी काही उपाय सांगितले की आपण ते करुन पाहतोच. आहारात कोणत्या गोष्टी कमी कराव्यात, कोणत्या गोष्टी वाढवाव्यात इथपासून ते कोणता व्यायाम, योगा करावा इथपर्यंत सगळे पर्याय आपण  करतो. ब्लॅक कॉफी रोज प्यायल्याने आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी याची फार मदत होते, हे आपण आतापर्यंत ऐकलेच असेल. यासाठी आपण वेटलॉस करताना साखरयुक्त चहा - कॉफी पिणे सोडून ब्लॅक कॉफी प्यायला सुरुवात करतो.

ब्लॅक कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे मेटाबॉलिझमही सुधारते आणि पचनक्रियाही चांगली होते. परंतु, ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत माहित असणं गरजेचं आहे. योग्य आहार आणि व्यायाम केल्याशिवाय ही पद्धत फायदेशीर ठरणार नाही. ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती, तसेच कोणत्या पद्धतीने कॉफी बनवली तर आपले वजन झपाट्याने कमी होईल याबद्दल आहारतज्ज्ञ राधिका रॉयल यांनी अधिक माहिती दिली आहे, ते पाहूयात(The Best Black Coffee Recipes That Help In Losing Weight Faster).

वजन कमी करण्यासाठी कॉफी नेमकी कशी बनवावी ?

साहित्य :- 

१. लिंबू - अर्धा कापलेला लिंबू२. कॉफी - १ टेबलस्पून ३. गरम पाणी - १ कप  

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

कृती :- 

१. एका कॉफी मगमध्ये लिंबाचा रस पिळून घ्यावा. २. आता यात आपल्या आवडीनुसार कॉफी पावडर घालावी. ३. त्यानंतर या मिश्रणात गरम पाणी ओतावे, आता ही कॉफी चमच्याने व्यवस्थित ढळवून घ्यावी. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

आपली वेटलॉस कॉफी पिण्यासाठी तयार आहे. 

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

वजन कमी करण्यासाठी ही वेटलॉस कॉफी कधी प्यावी ?

जर आपण दिवसातून ३ ते ४ कप दुधाने बनवलेली कॉफी किंवा चहा प्यायलात, तसेच त्यासोबत स्नॅक्स खाल्ले तर आपले वजन नक्कीच वाढेल. याउलट तज्ज्ञांच्या मते, लिंबूयुक्त अशा प्रकारे कॉफी बनवल्यास आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होऊ शकते. आपण ही वेटलॉस कॉफी सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशी दिवसांतून ३ ते ४ वेळा पिऊ शकता. परंतु रात्री झोपण्याच्या काही वेळापूर्वी कॉफी पिऊ नका, नाहीतर झोप लागणे कठीण होऊ शकते प्रत्येक १ कप ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर २ कप पाणी प्या जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. १ कप ब्लॅक कॉफी अंदाजे १७ अतिरिक्त कॅलरीज बर्न करते. दिवसातून २ कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो. जर आपण व्यायामापूर्वी ३०० मिलीग्राम कॉफी प्यायलात तर, वर्कआउटची इंटेंसिटी देखील  वाढेल. ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर सुमारे ६ ते ७ तासांपर्यंत फॅट बर्न होण्यास मदत होते.

दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण..

वजन कमी करण्यासाठी लिंबूयूक्त ब्लॅक कॉफी कशी उपयुक्त ठरते ? 

लिंबूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते त्यामुळे हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. लिंबाचा रस वजन कमी करण्यास देखील मदत करू शकतो. कॉफी पावडर चयापचय क्रियेचा वेग वाढवते. ही कॉफी प्यायल्याने सतत जाणवणारी  भुकेची भावना कमी होते, ज्यामुळे आपण ओव्हर इटिंग करणे टाळू शकतो. तसेच यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात आणि आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उत्साही व फ्रेश राहता येते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स