lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवसभर एनर्जी फुल ठेवणारे हे घ्या ५ हेल्दी ब्रेकफास्ट; नाश्ता करा, बॅटरी चार्ज!

दिवसभर एनर्जी फुल ठेवणारे हे घ्या ५ हेल्दी ब्रेकफास्ट; नाश्ता करा, बॅटरी चार्ज!

हे ५ कॉमन पदार्थ पण तेच बेस्ट ब्रेकफास्ट आहे असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण तसं आहे खरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 10:00 AM2021-11-06T10:00:00+5:302021-11-06T10:00:02+5:30

हे ५ कॉमन पदार्थ पण तेच बेस्ट ब्रेकफास्ट आहे असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण तसं आहे खरं!

Take 5 healthy breakfasts that keep you full of energy throughout the day; Have breakfast, be healthy | दिवसभर एनर्जी फुल ठेवणारे हे घ्या ५ हेल्दी ब्रेकफास्ट; नाश्ता करा, बॅटरी चार्ज!

दिवसभर एनर्जी फुल ठेवणारे हे घ्या ५ हेल्दी ब्रेकफास्ट; नाश्ता करा, बॅटरी चार्ज!

Highlightsआरोग्यदायी राहायचं असेल, तर रोज ब्रेकफास्ट करायलाच हवा आणि त्यातली वैविध्यता, पौष्टिकताही जपायलाच हवी.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ब्रेकफास्ट, न्याहारी हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आयुर्वेदात तर ब्रेकफास्टचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणीही ब्रेकफास्ट चुकवू नये याबाबत डॉक्टर, डाएटिशिअन्सही आग्रही असतात. कारण आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी शरीराला ऊर्जा आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वं पुरवण्यासाठी ब्रेकफास्टचा उपयोग होतो. आजवरच्या अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे की नाश्ता केल्यानं स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते, वजन वाढण्यास प्रतिबंध होतो, एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होतं, मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका टळतो, आपलं चयापचय सुधारतं आणि आपल्या शरीरातील उष्मांक (कॅलरीज) जळण्यासाठी त्याचा खूपच उपयोग होतो. ही यादी इथेच संपत नाही.
नियमितपणे नाश्ता करण्यामुळे आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टी घडतात.
१- आपला ‘बीएमआय’ (बॉडी-मास-इंडेक्स) संतुलित राहण्यास मदत होते.
२- आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी होतं.
३- आपल्या शरीराची तग धरण्याची क्षमता वाढते.
४- जंकफूडसारखे अनारोग्यकारी पदार्थ खाण्याची आपली इच्छा कमी होईल.
५- आपली ‘ओव्हरवेट’, वजनदार होण्याची शक्यता कमी होईल;
पण आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी दिवसभर उच्च ठेवायची असेल, प्रोटिनयुक्त आरोग्यदायी ब्रेकफास्ट आपल्याला हवा असेल, तर त्यासाठीचे पर्याय तरी नेमके काय? रोज कोणता ब्रेकफास्ट करावा, असा प्रश्नही घरातील महिलांना नेहमी पडतो.
त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी सुुचवलेले ब्रेकफास्टचे हे पाच उत्तम पर्याय..

१- इडली-
इडलीसारख्या पदार्थांत आंबवण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे आपल्या शरीराला अनेक गोष्टींचा लाभ होतो. आपल्या शरीराची प्रोटिन आणि व्हिटॅमिनची गरज इडलीसारख्या पदार्थांमुळे भागवली जाते. त्यामुळे आंबवलेल्या पदार्थांचा समावेश अधूनमधून आपल्या नाश्त्यात जरूर करावा.

२- डोसा-
हा एक पौष्टिक नाश्ता आहे, जो आपल्याला भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर प्रदान करतो.
३- पोहे-
आपल्याकडे पोहे तसे बरेच प्रसिद्ध आहेत. अनेकांकडे नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आले तर पोहे हा पहिला आणि सर्वोत्तम पर्याय असतो; पण या पोह्याचे नेमके काय फायदे आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. फायबर, लोह आणि कमी कॅलरीज असलेला हा एक निरोगी नाश्ता मानला जातो. ज्यांना डायबेटिस, मधुमेह झालेला आहे, त्यांच्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे आणि आश्चर्यकारकपणे एक चांगला प्रोबायोटिक देखील आहे.

४- खिचडी-
खिचडी हा आपल्याकडे अनेकांचा आवडता प्रकार आहे आणि अनेक पद्धतीनं रुचकर खिचडी तयारही केली जाते. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार प्रत्येक जण या खिचडीत नवनवे प्रयोग करीत असतो; पण खिचडीत विविध प्रकारच्या भाज्या, योग्य प्रमाणात मसाले घातले तर खिचडीची चव तर वाढतेच; पण तिच्या पौष्टिकपणातही खूप वाढ होते.
५- पराठा-
हा प्रकारदेखील आपल्याकडे अनेकांच्या आवडीचा आहे आणि लहान मुलंही चवीनं तो खातात. मुलांच्या डब्यातही बऱ्याचदा पराठा दिला जातो. अतिशय सुटसुटीत खायला, करायला सोपा आणि भरपूर पौष्टिक घटक असलेला हा उत्तम ब्रेकफास्ट आहे. पराठ्यातून आपल्या शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर्स मिळतात. सकाळी जर पराठे खाल्लेले असतील, तर दिवसभराचा आपला उत्साहही चांगला टिकून राहतो.
आरोग्यदायी राहायचं असेल, तर रोज ब्रेकफास्ट करायलाच हवा आणि त्यातली वैविध्यता, पौष्टिकताही जपायलाच हवी. हो, पण आपल्याला काही आजार, दुखणी असतील, तर कोणता ब्रेकफास्ट आपल्यासाठी अधिक चांगला आहे, हे डाएटिशिअनलाही एकदा जरूर विचारा. 

Web Title: Take 5 healthy breakfasts that keep you full of energy throughout the day; Have breakfast, be healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.