टीव्ही मालिकेतून तुलसी हे पात्र ९० च्या दशकात घराघरात पोहोचले. तिची ही भूमिका साकारणारी स्मृती इराणी ही राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे.(Smriti Irani fitness) पण तिच्या फॅट- टू- फिट जर्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कामाच्या धावपळीत, व्यस्त जीवनशैली आणि ताणतणावामुळे तिचे वजन वाढत गेले, ज्याचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. (Smriti Irani weight loss)वयाच्या ५० व्या वर्षी देखील स्मृती इराणी तंदुरुस्त आहे. स्मृती इरानीने वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे कठीण डाएट केले नाहीत, ना जिममध्ये तासन् तास घाम गाळला.(white foods to avoid) तिचा मंत्र होता योग्य पदार्थ खा आणि चुकीचे पदार्थ खाणे टाळा. वजन कमी करण्यासाठी तिने काय केले पाहूया.
गव्हाच्या पीठात मिसळा ‘या’ २ गोष्टी, Vitamin D-B12 वाढेल भरपूर- हाडे होतील मजबूत, गट हेल्थही सुधारेल
स्मृती इराणीने १८० दिवसांत २७ किलो वजन कमी केले. यासाठी तिने आहारात ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले. तिने ब्रेड, पास्ता, बिस्किटे, बिया, सॉस आणि ग्रेव्ही यांसारख्ये पदार्थ खाणे बंद केले. ग्लूटेन फ्री पदार्थ बंद केल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
ती रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास योगा आणि मेडिटेशन करते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मन शांत होते. तसेच कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये अंडी, ड्रायफुट्सचा समावेश करते. ज्यामुळे तिचे पोट कायम भरलेले राहते.
तिला वांग्याचे भरीत प्रचंड आवडते. वांग्यातील फायबर पोट दीर्घकाळ भरण्यास मदत करते आणि भूक देखील कमी करते. ज्यामुळे वजन नियंत्रित होऊन रक्तातील साखर कमी होते. तसेच जेव्हा शक्य होते तेव्हा ती वॉक करते. तिच्या मते, वजन कमी करण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचे आहे. आपण जंक फूड, पांढरे पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच भरपूर पाणी देखील प्यायला हवं. आहारात भरपूर भाज्या आणि फळे खा. ज्यामुळे आपले पोट भरलेले राहिल आणि भूक देखील लागणार नाही.
Web Summary : Smriti Irani lost 27 kg in 180 days by avoiding gluten and dairy. She includes yoga, lemon water, eggs, and nuts in her routine. She emphasizes consistency, avoiding junk food and white foods, and staying hydrated with plenty of vegetables and fruits.
Web Summary : स्मृति ईरानी ने 180 दिनों में 27 किलो वजन कम किया, ग्लूटेन और डेयरी से परहेज किया। वह योग, नींबू पानी, अंडे और सूखे मेवे को अपनी दिनचर्या में शामिल करती हैं। वह निरंतरता पर जोर देती हैं, जंक फूड और सफेद खाद्य पदार्थों से परहेज करती हैं, और खूब सब्जियां और फल खाकर हाइड्रेटेड रहती हैं।