Join us  

वजन कमी करायचं? पण भात सोडवत नाही? वेट लॉससाठी नेमका किती ग्रॅम भात खावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 7:06 PM

Rice For Weight Loss: Here's How Much You Should Eat For Effective Results : दाक्षिणात्य लोक नेमकं कोणत्या प्रकारचा भात खातात? ज्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही?

जर कोणी तुम्हाला विचारले की तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? तर बरेच लोक नक्कीच राजमा-भात, छोले-भात, कढी-भात यांसारख्या पदार्थांची नावे देतील (Rice for Weight Loss). या सर्व पदार्थांमध्ये एक कॉमन गोष्ट, ती म्हणजे भात. भारतीय लोकांना भात प्रचंड आवडते. भात हा भारतीय थाळीचा अविभाज्य भाग आहे आणि तो रोज खाल्ला जातो (Fitness Tips).

काही लोक सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस भात खातात. पण वजन वाढलं की, आहारातून वगळण्यात येणारा पहिला पदार्थ म्हणजे भात. पण तांदुळाचे सेवन योग्य प्रमाणात प्रमाणात केल्यास वजन वाढत नाही. पण वजन वाढू नये म्हणून किती प्रमाणात भात खावा? याची माहिती आपल्याला हवी. वेट लॉससाठी किती प्रमाणात भात खावा? याबद्दलची माहिती न्यूट्रिशनिस्ट मॅक सिंग यांनी इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे शेअर केली आहे. शिवाय भात खाण्याचे फायदे किती? पाहूयात(Rice For Weight Loss: Here's How Much You Should Eat For Effective Results).

तांदुळाचे आरोग्यदायी फायदे

पचायला सोपे

वजन कमी करताना भात आहारातून वगळू नका. तांदूळ खरंतर पचायला सोपा असतो आणि चयापचय दर सुधारण्यास देखील मदत करते. जितका चयापचय दर जास्त असेल, तितके वजन कमी करणे आपल्यासाठी सोपे होते.

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

फॅट लॉससाठी मदत

१०० ग्रॅम तांदळात फक्त ०.६ ग्रॅम फॅट असते. याचा अर्थ ओट्स आणि क्विनोआ सारख्या निरोगी धान्यांपेक्षा त्यात कमी चरबी असते, जे लोक सहसा वजन कमी करण्यासाठी खातात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण भाताचे सेवन करू शकता.

ग्लूटेन मुक्त

तांदूळ हे खरंतर ग्लूटेन मुक्त आहे. ज्यामध्ये चरबी नाही, कोलेस्टेरॉल नाही आणि सोडियम-मुक्त आहे. त्यामुळे जर आपण वजन कमी करण्यासाठी भात आहारातून भात वगळत असाल तर, असे करू नका. प्रमाणात भात खा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते.

पोषक तत्वांनी परिपूर्ण

तांदूळ हे व्हिटॅमिन बी आणि मॅग्नेशियम सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. १०० ग्रॅम तांदळात ७ ग्रॅम पर्यंत प्रथिने असतात. भातामध्ये असलेले प्रोटीन केवळ रक्तदाब कमी करत नाही तर, वेट लॉससाठीही मदत करते. त्यामुळे भात खाताना पोर्शन कण्ट्रोलमध्ये ठेवून खा.

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

भात नेमका कोणता खावा?

पांढरा तांदूळ शुद्ध आहे. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. जर आपल्याला वेट लॉसमध्ये भात सोडवत नसेल तर, पॉलिश न केलेलं तांदूळ खा. आपण पाहिलं असेल दाक्षिणात्य लोक भरपूर प्रमाणात भात खातात, पण त्याचं अधिक वजन वाढत नाही. ते खरंतर पॉलिश न केलेलं तांदूळ खातात. आपण देखील याच प्रकारच्या तांदुळाचा आहारात समावेश करू शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स