Join us

पोळी-भात खाणं सोडल्याने वजन खरोखर कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 18:14 IST

Simple And Easy Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी अनेकजण पोळी, भात खाणं सोडतात. पण त्यामुळे खरोखर वजन कमी होतं का?(Quitting Roti And Rice is really helpful For Weight loss)

ठळक मुद्दे३ गोष्टी सांभाळल्या तर वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास निश्चितच मदत होऊ शकते.  

वाढत्या वजनाची समस्या सध्या खूप जास्त वाढलेली आहे. एक तर बहुतांश लोक दिवसातले ८ ते १० तास एका जागी बसून काम करतात. त्यात त्यांना व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळही नसतो. शिवाय खाण्यापिण्यात जंक फूड, प्रोसेस्ड फूड, गोड पदार्थ यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे वजन भराभर वाढतं. मग हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण पोळी, भात असे पदार्थ खाणं एकदम बंद करतात. पण खरंच असं केल्यामुळे वजन कमी होतं का? याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत ते पाहा. (Quitting Roti And Rice is really helpful For Weight loss?)

 

पोळी- भात खाणं सोडल्याने वजन कमी होतं?

याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली माहिती consciouslivingwithshalini या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्या सांगतात की पोळी आणि भात हे आपल्या भारतीय आहारातले दोन महत्त्वाचे पदार्थ असून त्यांच्यातून आपल्याला कार्बोहाइड्रेट्स मिळतात.

नर्सरीतून रोपं आणताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या? ४ टिप्स- हिवाळ्यातली फुलझाडांची खरेदी होईल परफेक्ट

जेव्हा तुम्ही हे दोन पदार्थ खाणं बंद करता तेव्हा तुमचं शरीर शरीरात साचलेल्या ज्या कॅलरी असतात त्यांच्याकडून एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमचं वजन निश्चित कमी होतं. पण ही क्रिया फार फार तर २ ते ३ आठवडे चालू शकते. यानंतर तुम्हाला खूप जास्त गोड पदार्थ खाण्याची भावना निर्माण होते, खूप भूक लागते, गळून गेल्यासारखं वाटतं, एनर्जी एकदम कमी होते.

लग्नसराईसाठी दागिने- कपडे कसे घ्यावे? करिना कपूरकडून घ्या फॅशन टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल

यानंतर मग अनेकजण पुन्हा पोळी आणि भात खाणं सुरू करतात. पण याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. आधीच्या अनुभवामुळे मग तुमचं शरीर भात, पोळी यातून मिळणाऱ्या कॅलरी फॅट्सच्या स्वरूपात शरीरात जास्त प्रमाणात साठवून ठेवायला सुरुवात करतात. यामुळे मग आपोआपच तुम्ही जेवढं वजन कमी केलं आहे तेवढं झर्रकन वाढतं. काही जणांच्या बाबतीत तर त्यापेक्षाही जास्त वाढतं. 

 

त्यामुळेच आहारतज्ज्ञ सांगतात की अशा पद्धतीने भात आणि पोळी खाणं एकदम बंद करू नका. योग्य पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात रोजच्यारोज १ वाटी प्रोटीन्स देणाऱ्या उसळी आणि १ वाटी भाज्या असायलाच पाहिजेत.

तुमच्या मुलाला शिकवा ३ गोष्टी!! जे करेल त्यात यश मिळवून आयुष्यभर सुखी, आनंदी राहील 

आठवड्यातून ६ दिवस १ तासाचा व्यायाम करा. कारण शरीरावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. रात्रीची झोप ७ ते ८ तासांची झालीच पाहिजे. शिवाय झोप शांत लागली पाहिजे. या ३ गोष्टी सांभाळल्या तर वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास निश्चितच मदत होऊ शकते.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नव्यायाम