बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. अगदी कमी वयातही हा आजार मागे लागत आहे. एकदा मधुमेह झाल्यानंतर तो नियंत्रित ठेवण्यासाठी मग त्या व्यक्तींना खाण्यापिण्याची कित्येक पथ्ये पाळावी लागतात. कोणता पदार्थ खायचा, कोणता टाळायचा हे तर लक्षात ठेवावंच लागतं पण त्यासोबतच तो पदार्थ खाण्याचं योग्य प्रमाण कोणतं याचेही नियम पाळावे लागतात. कारण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराचे नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळेच मधुमेही व्यक्तींना नाश्त्यामध्ये काय द्यावं हा प्रश्नही असतोच (Perfect Breakfast For Diabetic People). म्हणूनच तज्ज्ञांनी दिलेलं हे खास उत्तर पाहा...(best breakfast menu for diabetic people)
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खावेत?
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पोहे- उपमा खाणं टाळायला हवं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता बहुसंख्य लोकांना असं वाटतं की हे पदार्थ जर वगळले तर मग नाश्त्याला द्यायचं काय? याविषयी डॉक्टरांनी दिलेली माहिती drbhagyeshkulkarni या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर सांगतात की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी 'non grain' प्रकारचा नाश्ता केला पाहिजे.
दिवाळीत पणत्यांमध्ये महागडं तेल घालायला नको वाटतं? फक्त १० रुपयांचा उपाय- लावा भरपूर पणत्या
नॉन ग्रेन नाश्त्यामध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचा डोसा, मुगाच्या डाळीच्या इडल्या, बेसनाचे धिरडे, बेसनाचा ढोकळा, मुगाचे पीठ असणारे थालिपीठ किंवा पराठे असे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता. जर संपूर्ण आठवडाभर तुम्ही हा नाश्ता केला तर आठवड्यातून एकदा इडली खाल्ली तरी चालते.
पण इडली खाण्याची काही पथ्ये मात्र पाळायला हवीत. आपल्याकडे आपण ३ ते ४ इडल्या आणि एक वाटी सांबार असं एकत्र करून खातो. नारळाची चटणी तर त्यासोबतच कित्येकदा घेतही नाही.
दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल
पण हे प्रमाण अत्यंत चुकीचं आहे. १ इडली जर तुम्ही खाणार असाल तर तिच्यासोबत १ वाटी सांबार आणि तेवढीच चटणीही खायला हवी. तर ते इडली खाणं तुमच्या तब्येतीला मानवू शकतं, असं डाॅक्टर सांगतात.