Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज खा 'या' पिठाची चपाती, पोटाचा घेर होईल कमी- महिनाभरात दिसेल फरक; वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 09:30 IST

oats chapati for weight loss: oats flour chapati: belly fat reduction food: सलग पंधरा दिवस ओट्सची चपाती खाल्ल्यावर लठ्ठपणा सहजपणे कमी होईल.

वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी विचार येतो जिम आणि महागडं डाएट. भात बंद, चपाती कमी, आवडीच खाणं टाळायचं आणि सतत भूक नियंत्रणात ठेवायचं अशी अनेकांची कल्पना असते.(oats chapati for weight loss) पण खरं सांगायचं तर वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी किंवा कठोर डाएट करणं गरजेचं नाही. (oats flour chapati)वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक लोक ग्लुटेन- फ्री अन्नपदार्थांची निवड करतात. अनेकांना ग्लूटेन असणारे पदार्थ आवडत नाही. यासाठी ओट्स हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.(belly fat reduction food) ओट्सपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, पण आपण कधी ओट्सची चपाती खाल्ली आहे का? सलग पंधरा दिवस ओट्सची चपाती खाल्ल्यावर लठ्ठपणा सहजपणे कमी होईल. 

बर्फ-दूध-मधाचा फेस मास्क, रशियन मुलींसारखा ग्लो येईल चेहऱ्यावर! ओपन पोअर्स- पिंपल्स होतील कमी

ओट्सची चपाती खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. वजन वाढण्याचे मुख्य कारण सतत खाण्याची सवय, स्ट्रेट, अपुरी झोप. ओट्समध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करते. यामुळे पोट साफ राहतं, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट फुगण्याच्या समस्या देखील कमी होतात. पोट व्यवस्थित काम करु लागलं की हळूहळू पोटाचा घेर देखील कमी होऊ लागतो. ही चपाती कशी बनवायची पाहूया. 

ओट्सची चपाती बनवण्यासाठी मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. चाळणीने पीठ चाळून घ्या. गरम पाण्यात अर्धा चमचा तूप घाला. आता पिठामध्ये गरम पाणी घालून चमच्याने हळूहळू ढवळा. या पिठात ग्लूटेन नसल्यामुळे ते चिकट लागणार नाही. नंतर पीठ हाताने मळा. पीठ तयार झाल्यानंतर त्याचा गोळा घ्या. त्यावर थोडे ओट्सचे पीठ लावा आणि चपातीसारखे लाटून घ्या. तव्यावर चपाती व्यवस्थित भाजा. हिरव्या भाजीसोबत खा. 

वजन कमी करताना अशक्तपणा येऊ नये यासाठी प्रोटीनही महत्त्वाचं असतं. ओट्समध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं, जे स्नायूंना ताकद देतं आणि शरीराला ऊर्जा पुरवतं. त्यामुळे ओट्सची चपाती खाल्ल्यावर थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat oats chapati daily, reduce belly fat, see difference monthly.

Web Summary : Oats chapati aids weight loss by keeping you full, improving digestion, and reducing bloating. It's rich in fiber and protein, providing energy and reducing fatigue. Make it by grinding oats, mixing with hot water and ghee, and cooking like regular chapati.
टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्न