lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नाश्ता करायलाच वेळ नाही? मग हे चविष्ट, झटपट एनर्जी बॉल्स खा!

नाश्ता करायलाच वेळ नाही? मग हे चविष्ट, झटपट एनर्जी बॉल्स खा!

पौष्टिक कायम महागच असतं हे कुणी सांगितलं, घरच्या घरी अत्यंत सोपे, पोटभरीचे चविष्ट आणि तरीही सकस पर्याय सहज सापडतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 06:04 PM2021-03-17T18:04:44+5:302021-03-17T18:13:22+5:30

पौष्टिक कायम महागच असतं हे कुणी सांगितलं, घरच्या घरी अत्यंत सोपे, पोटभरीचे चविष्ट आणि तरीही सकस पर्याय सहज सापडतात.

No time for breakfast? Then eat these delicious instant homemade healthy energy balls! | नाश्ता करायलाच वेळ नाही? मग हे चविष्ट, झटपट एनर्जी बॉल्स खा!

नाश्ता करायलाच वेळ नाही? मग हे चविष्ट, झटपट एनर्जी बॉल्स खा!

Highlightsबाजारात मिळणारे जे न्यूट्रीबार असतात हा त्याचाच प्रकार,पण घरी केलेला आणि स्वस्त. मस्तहीछायाचित्रं प्रतिकात्मकं आहेत. सौजन्य गुगल 

शुभा प्रभू साटम

ब्रेकफास्टचं केवढं महत्व. सगळे सांगतात की, नाश्ता करा. पण घरचं सगळं काम जिवाच्या आंकाताने करणाऱ्या कुणाही ‘तिला’ सकाळी नाश्ता करायलाही वेळ नसतो. सगळं भराभर आवरुन कसंबसं तोंडात काहीतरी कोंबलं तरी पुरे अशी गत. अनेकजणी तर अशा की, नाश्ताच करत नाहीत. त्यांना वेळच नसतो.
जे सकाळचं तेच सायंकाळचं. साडेपाच-सहाला भूक लागली की काय खायचं असा प्रश्न पडतो. तेव्हाही वेळ नसतो, घाई असते, अश्यावेळी मग विकतच्या पदार्थाची मदत घेतली जाते. नोकरीवरून थकून येताना कडकडून भूक लागलेली असते त्यासाठी भेळ,समोसे असं खाल्लं जातं. वयात येणाऱ्या मुली, गरोदर महिला, ॲनिमिक महिला यांना तर पोषणाची भरपूर गरज असते. पण खायचं काय हाय प्रश्न. डाएटचा कितीही विचार केला तरी प्रत्यक्षात जे मिळेल ते खाणं होतं.  ज्यांना हे कळतं की आपलं खाणं चुकतं, नाश्ता तर अजिबात चुकवता कामा नये. त्याही  नाईलाजाने  येईल ते खातात आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. नोकरदार बायका बिचाऱ्या नेहमी घाईत. गृहिणी सदैव कामात,मग पोषक खायचं तरी कसं?
या सर्वांची अडचण अगदी खरी असते ,त्यात दुमत नाही, मग वेळ आणि भूक यांची सांगड कशी घालावी?
आज पाहू अश्या वेळी उपयोगात येणारा सोपा प्रकार, एनर्जी बॉल्स.
बाजारात मिळणारे जे न्यूट्रीबार असतात हा त्याचाच प्रकार,पण घरी केलेला आणि स्वस्त. मस्तही. नाश्ता, सायंकाळचं खाणं, मधल्यावेळी भूक लागली की हे एनर्जी बॉल्स मस्त खा. ताकद कमवा.

 


तर हे एनर्जी बॉल्स कसे बनवायचे? अगदी सोपं आहे. 


खजूर कोणतेही घ्या ,बिया काढून तुकडे करून घ्या. त्यात  अक्रोड, सुके अंजीर,मनुके ,काजू,बदाम,पिस्ते,चिलगोजा,काहीही घालू शकता,काही नसेल तर चक्क शेंगदाणे घ्या,किंवा सुके खोबरेही घालता येईल. फक्त व्यवस्थित लालसर करून घ्या.
खजुर आणि सुका मेवा प्रमाण समान हवं.
यात घालायला वेलची,जायफळ,खसखस, काय आवडेल ते.
आधी किंचित तुपावर मेवा भाजून घ्या,नंतर खजूर परतून घ्या,वेगवेगळे परता.
प्रोसेसर मध्ये अथवा मिक्सर मध्ये सर्व घालून फिरवून घ्या,कोरडे फिरवा,एकजीव हवे.
आता परातीत हे काढून त्याचे छोटे लाडू वळून घ्या.
अत्यन्त पौष्टिक आणि सोपे असे हे लाडू आयत्या भुकेच्यावेळी चांगला पर्याय ठरतात. मुलांनाही देता येतील. स्वत:ही एक लाडू पटकन तोंडात टाकला की पोषणही, एनर्जीही.
तुम्ही यात ओट्स , मुसली पण घालू शकता, फक्त आधी कोरडी शेकवून घ्या.
ब्लेंडर मध्ये हा लाडू आणि दूध घुसळून झटपट स्मुदी होते,पटकन पिऊन कामाला लागता येऊ शकतं. 
बाहेर हे लाडू साधारण पंधरा वीस दिवस उत्तम टिकतात,फ्रिज मध्ये जास्त काळ,
पौष्टिक महाग असतेच असे नाही, किंवा त्याला करायला खूप वेळ लागतो असेही नाही.
थोडी आयडियेची कल्पना लावली की सुचते.
हे लाडू घरातल्या वृद्ध व्यक्तींना पण चांगले,आपल्या वैयक्तिक आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करावे.
मुख्य म्हणजे करुन स्वत: खा, बायकांनी आपल्या पोषणाकडेही लक्ष द्यायलाच हवं.

(लेखिका खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत.)
shubhaprabhusatam@gmail.com

Web Title: No time for breakfast? Then eat these delicious instant homemade healthy energy balls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.